विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भुईकोहोळा- ही भोंवरीच्या वेलाची जात आहे. यास जांभळ्या रंगाचीं फुलें पावसाळ्यांत येतात. वेल पुष्कळ वर्षें टिकतो. वेलास फुले पावसाळयांत येतात. वेल पुष्कळ वर्षे टिकतो. वेलास फळें व बीं कधीं कधीं येतें. वेलाच्या मुळांशीं जमिनींत मोठामोठाले गड्डे, सुरणायवेढाले पण निरनिराळ्या आकारांचे लागतात; तेच भुईकोहोळे होत. ते औषधी असून त्यांची भाजी करून खाण्यांत येते. त्यांचें कुटून पीठ करून तें दुधांत घालून लापशी केली तर ती फार उत्तम व अति गोड होते. हे गड्डे रताळ्याप्रमाणें भाजून खाण्यासहि गोड लागतात.