विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीष्म- सोमवंशीय शंतनु राजास गंगेपासून झालेला पुत्र. यानें लहानपणीं पित्याच्या सुखासाठीं राज्यवर न बसण्याची शपथ वाहिली व आमरण ब्रम्हचारी राहिला. तेव्हां 'इच्छामरणी होशील' असा पित्यानें आशिर्वाद दिला. हा भारतीय युद्धांत दहा दिवस लढला. यानें आपला बंधु विचित्रवीर्य याच्याकरितां काशी राजाच्या कन्या अंबा, अंबिका, अंबालिका यांस सर्व राजांचा पराजय करून आणिले. परशुरामाचा हा शिष्य होता पण युद्धमध्यें त्याचाहि भीष्मानें पराभव केला होता. शिखंडीला पुढें घालून अर्जुनानें यास जिंकल्यावर उत्तरायणार्यंत हा शरपंजरी राहिला व नंतर यानें देहत्याग केला. युद्धानंतर यानें धर्मराजास राजधर्म, वर्णधर्म इत्यादींचा उपदेश केला.