विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमस्वामी- रामदासस्वामींचा एक शिष्य व चरित्रकार. त्रकार शके १५६४. यास शहापूर येथील मठाचें महंतपण मिळालें होतें. शके १५९७ च्या सुमारास हा शिवाजीबरोबर तंजावरकडे गेला असतां व्यंकोजीनें तेथें एक मठ बांधून दिला; त्याची परंपरा अद्याप चालत आहे. यानें समर्थांचें एक लहान चरित्र लिहिलें असून शिवाय कांहीं पदें केलीं आहेत. मृत्यु शके १६६३.