विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमसेन दीक्षित- हा शांडिल्य गोत्री असून कान्यकुब्ज देशांतील राहणारा होता. यानें मम्मटाच्या काव्यप्रकाशावर 'सुधासागर' नामक टीका लिहिली आहे. तिचा काल त्यानें एका पद्यांत विक्रमसंवत् १७७९ असा दिला आहे. हा मोठा वैय्याकरणी होता. यानें अलंकारसारोद्धार म्हणून अलंकारशास्त्रावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला असें वरील टाकेवरून दिसतें.