विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भीमथडी- मुंबई इलाखा, पुणें जिल्ह्यांतील एक तालुका. यांत दौंड पेट्याचा अंतर्भाव होतो. क्षेत्रफळ १०३६ चौ. मैल. यांत बारामती हें मोठें गांव असून हेंच तालुक्याचें. मुख्य गांव आहे. खेडीं १२९ आहेत. या तालुक्याची लोकसंख्या दीड लाख आहे. मुठा नदीच्या कालव्यानें पुष्कळ जमिनीस पाणी मिळतें.