विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भिनमाल- उर्फ भिन्नमाळ, उर्फ भिल्लमाळ, उर्फ श्रीमाळ. ही राजपुतान्यांतील प्राचीन गुर्जर (गुर्जर प्रतिहार) राजांची राजधानी अबूपर्वताच्या वायव्येस २५ कोसांवर आहे. याच राजांनीं पुढें कनोज येथें सम्राट-सत्ता गाजविली. भडोच येथील गुर्जर राजेहि याच भिनमालच्या घराण्याच्या एका शाखेचे वंशज होतें.ह्युएनत्संगानें या गांवाचा उल्लेख केला आहे (वाटर्स-ह्युएनत्संग; जॅक्सन- बाँबे ग्याझे. पु.१)