विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भास्करराज- हा भासुरानन्द भास्करानंदनाथ अगर भास्करराय इत्यादि नांवांनीं प्रसिद्ध आहे. हा १७ व्या शतकांत उदयास आला. यानें कठ, केन, जाबाल, त्रिपुर, महामुंडक इत्यादि उपनिषदांवर भाष्यें लिहिलीं आहेत. याशिवाय अभिनववृत्तिरत्नाकर, अबधुतगीताव्याख्या अष्टावक्रगीताव्याख्या, आत्मबोधव्याख्या, वृत्तचंद्रोदय इत्यादि १५५२० ग्रंथ लिहिले आहेत.