प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर      

भाषाशास्त्र- भाषेचा अभ्यास आणि त्याच्यावरून मानवजातीचा जो इतिहास यांचा ज्या शास्त्रांत विचान केलेला असतो त्याला भाषाशास्त्र असें म्हणतात. हें शास्त्र स्वंतत्र नांवानें १९ व्या शतकांत निर्माण झालें. पण भाषेच्या पद्धतशीर अभ्यासास प्रारंभ हिंदुस्थानांतच झाला, आणि १९ व्या शतकांत त्याचें पुढील संवर्धन होण्यास प्रारंभ झाला (विज्ञानेतिहास-वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें पहा) भाषाशास्त्राचीं मुख्य दोन अंगें आहेत एक भाषेच्या उत्पत्तीच्या व तिच्या वाढीचा इतिहास सांगणें व दुसरें, एका भाषेच्या इतर भाषांशीं असलेल्या तुलनात्मक माहिती देणें. म्हणून प्रत्येक भाषेचा (१) ऐतिहासिक व (२) तौलनिक अशा दोन पद्धतींनीं अभ्यास केला पाहिजे गेल्या शतकांत या विषयाकडे विद्वानांचें विशेष लक्ष गेलें त्यावेळीं संस्कृत, पर्शियन, ग्रीक लॅटिन केल्टिक, ट्युटॉनिक, स्लॅव्हॉनिक, लिथो-लेटिश, आर्मेनियन व अल्बेनियन या भाषांच्या शब्दकोशांत व व्याकरणांत एक प्रकारचें साम्य दिसून आलें; आणि तशाच प्रकारचें साम्य हिब्रु असीरियन अरबी, एथिओपियन, सीरियाक या भाषांमध्यें द्दष्टीस पडलें. पण पहिल्या वर्गांतील भाषांचें दुस-या वर्गांतील भाषांशीं तशा प्रकारचें साम्य आढळलें नाहीं. वरील प्रकारचें साम्य आफ्रिकेंतील कांहीं भाषांमध्यें, आणि तसेंच दक्षिण हिंदुस्थानांतील तेलगू, तमिळ, मल्याळम् व कानडी या भाषांमध्यें दिसून आलें आहे. म्हणून भाषा शास्त्रज्ञांनीं वरील प्रकारच्या साम्यामुळें भाषांचे इंडो-जर्मन, सेमिटिक, मंगोलियन, फिनिशियन, द्रविड, दक्षिण अमेरिकन वगैरे निरनिराळे मुख्य वर्ग पाडले आहेत. भाषांची परस्पर तुलना करावयाची झाल्यास अगोदर एकेक भाषा घेऊन तिचें ऐतिहासिक परीक्षण केलें पाहिजे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीच्या मराठी भाषेपासून हल्लींची मराठी भाषा कशी तयार झाली हें पाहून मराठी भाषेचा इतिहास आपण तयार करतों त्याप्रमाणें प्रत्येक भाषेचा ऐतिहासिक विचार प्रथम केला पाहिजे. म्हणजे सर्व भाषांचा तौलनिक विचार करतां येतो. आणि तुलनात्मक विचार करीत गेल्यामुळें भाषाशास्त्रज्ञांनां सर्व भाषांची जननी अशी आदिभाषा तयार करण्याचीहि नंतर इच्छा होते.

भा षे चा ऐ ति हा सि क अ भ्या स.- भाषा म्हणजे आपले विचार दुस-याला चांगले समजतील अशा रीतीनें कळविण्याचें साधन किंवा खुणाचा समुच्चय, याला भाषा असें लौकिक रीतीनें म्हणण्याचा प्रघात आहे. भाषेंच्या अभ्यासांत (१) वर्णोंत्पत्ति (२) वर्णोंच्चार (३) शब्दांची घटना, (४) त्यांचा परस्परांशीं संबंध (५) शब्दसमूदायांचा अगर वाक्यांचा परस्पर संबंध (६) अर्थोत्पति (७) शब्द व अर्थ यांचा परस्पर संबंध, (८) भाषेची उत्पत्ति व तिचें कार्य आणि (९) भाषेच्या पोटभाषा इतक्या गोष्टींचा समावेश होतो.

भा षो त्प त्ति– कोणत्याहि भाषेचें अस्तित्व मन आणि उच्चार (म्हणजे विचार आणि व्यंजना) या दोहोंवर अवलंबून असतें. विचारविनयाची इच्छा हें भाषेंच्या उत्पत्तीचें आद्य कारण होय. मनुष्याजवळ विचार विनिमयाचीं अनेक साधनें आहेत. उदाहरणार्थ, पहिलें साधन शरीराचे व विशेषतः हातापायांचे हावभाव; दुसरें मुद्रेंतील फरक; तिसरें आवाज किंवा मुखोच्चार. प्रथम कोणत्या मनुष्यानें केव्हां व कोणत्या प्रकारें बोलण्यास सुरवात केली, हें ठरविणें अशक्य आहे. अनेक माणसें एकत्र आलीं असतां अनेकदां बोलण्याचे प्रयत्न होऊन ते पुष्कळ वेळां फसल्यानंतर शेवटीं आलें असावें. प्राथमिक अवस्थेंतील लोकांनीं विचारविनिमयाकरितां वर सांगितलेल्या तिन्ही साधनांचा उपयोग केला असावा, तथापि त्यांत प्रामुख्य हातापायांच्या हावभावांनां असावें. कारण करपल्लवी भाषा रानटी लोकांत अद्यापहि पहावयास मिळते. तसेंच मुका, बहिरा हा मनुष्य आपले विचार हावभावनेंच व्यक्त करतो. तथापि वरील तिन्ही साधनांपैकीं आवाज किंवा मुखोच्चार हें सर्वांत अधिक योग्य साधन असल्यामुळें  योग्यतमांच्या  अतिजीवनाच्या (सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट) नियमाप्रमाणें तेंच प्रमुख साधन बनलें आवाज या विचारविनिमयाच्या साधनाचे अनेक फायदे आहेतः- पहिला फायदा काटकसरीच्या होय. कारण ज्या इंद्रियापासून आवाज निघतो तें इंद्रिय दुस-या कोणत्याहि कार्यासाठीं उपयोगी पडत नाहीं. आणि इतर इंद्रियांपासून आवाज निघतहि नाहीं. दुसरा फायदा असा कीं, इतर हावभावांच्या साधनांपेक्षां आवाजानें मनांतील व्यापारांचे सूक्ष्म भेदाभेद अधिक अंतरावरून सुद्धां नीट समजून येतात, इतकेंच नव्हे तर मध्यें जड पदार्थ आड आले तरी आवाजाला अडथळा भासत नाहीं. भाषा ही आवाजाच्या पुढची व एक निराळी पायरी आहे. कारण आवाजावरून मनोभाव जाणणें हा प्रकार सर्व प्राण्यांमध्यें आढळून  येतो. भाषा ही पूर्वापार चालत आलेली गोष्ट असून तिची धाटणी ज्या त्या समाजावर अवलंबून असते. भाषा ही ईश्वरदत्त देणगी आहे अगर ती आपल्या अगदीं आद्य पूर्वजांनीं निर्माण केली आहे, हीं दोन्ही मतें चूक असून ती विकासवादाच्या (इव्हाल्यूशन) तत्त्वाप्रमाणें मूळ सुखदुःखदर्शक किंकाळण्यांपासून परिणत झाली आहे. साध्या किंकाळ्या उच्चनीय स्वरांत आणि कमीअधिक प्रमाणांत काढून मनुष्याला सुख, दुःख भीति इच्छा, क्षुधा, तृषा, प्रकृति, विकृति वगैरे अनेक भावनांचें दिग्दर्शक करतां येते नंतर त्या त्या आवाजाना विशिष्ट अर्थबोधक असें कायमचें स्वरूप अनुकरणानें प्राप्त होत गेलें असावें. प्रत्येक माणसानें प्रत्येक भावनेचा निराळा आवाल काढण्याऐवजीं आपल्या पूर्वजांनीं किंवा आपल्याचपैकीं इतरांनीं जे विशिष्ट भावनादर्शक विशिष्ट आवाज काढले त्यांचेंच अनुकरण करणें सोईचें होतें. या नियमाप्रमाणें आतांपर्यंतच्या सर्व भाषा रूढिप्रधान आहेत. अनुकरणामुळें अर्थव्यक्तीकरण सुलभ होतें. ज्याप्रमाणें प्रारंभीचीं लेखनचिन्हें द्दश्य वस्तूंच्या स्थूलाकृतींशीं सद्दश होतीं, त्याप्रमाणें प्रारंभींचे उच्चारलेले आवाज हे ऐकलेल्या आवाजांचे अनुकरणपर होते. अशा प्रकारच्या अनुकरणाचे दोन भाग पडतात. (१) बाह्यसृष्टीमध्यें निघणा-या आवाजांचें अनुकरण व (२) मनुष्याच्या आवाजाचें अनुकरण एखाद्या दुःखदर्शक आवाजावरून अगर करमणुकीसाठीं हंसण्याच्या आवाजावरून त्या त्या भावना सहज स्पष्ट होत असल्या तरी ती भाषा होत नाहीं; पण तोच आवाज आपण जाणूनबुजून दुस-याला आपले मनोविकार कळावेत यासाठीं काढला कीं लागलीच ती भाषा होते. एखादा मनुष्य आपल्याला ऐकूं येईल अशा त-हेनें खोकला कीं आपलें लक्ष तिकडे वेधतें. पण आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठीं मुद्दाम तो मनुष्य खोकला कीं ती भाषा झाली. येथपासून खालच्या प्राण्यांमध्यें व मनुष्यांमध्यें या अर्थव्यक्तीच्या बाबतींत फरक पडण्यास सुरवात झाली. वाणीला द्दश्य व कायमचें स्वरूप अनुकरणानें प्राप्त झालें. परंपरा किंवा रूढ हें तत्व भाषा व धार्मिक, सामाजिक चालीरीती यांमध्यें सारख्याच त-हेनें द्दष्टोत्पत्तीस येतें. रूढीमुळें शब्दाचा मूळ अर्थ बदलून निराळा अर्थहि प्राप्त होतो. सर्व भाषांच्या इतिहासामध्यें मूळ किंवा यौगिक अर्थ नाहींसा होऊन रूढार्थ उपयोगांत आल्याचीं अनेक उदाहरणें सांपडतात. भाषांमध्यें सर्वांत प्राचीनतम वर्ग स्थितिवाचक शब्दांचा होय. या स्थितिवाचक धातूंनां पुढें पुरूष, वचन, लिंग हीं जोडण्यांत आलीं. नंतर नामें उपयोगांत आलीं. व नामांनां पुढें विभक्ति, वचन व लिंग हीं जोडण्यांत आलीं. अशा रीतीनें क्रियापद व नाम यांची जुळणी झाल्यावर भाषा अस्तित्वांत आली. यानंतर विशेषणें क्रियाविशेषणें इत्यादि किरकोळ भेद होत गेलें.

भा षां चा तु ल ना त्म क अ भ्या स.- जगांतील भाषांचें वर्गीकरण करण्याच्या दोन पद्धती आहेतः (१) शब्द अगर रचना यांच्या विचाराच्या योगानें निरनिराळ्या भाषांचे गट तयार करणें आणि (२) उत्पत्तीच्या किंवा वंशानुक्रमाच्या तत्त्वावर विभागणी करणें. पहिल्या पद्धतीप्रमाणें एंकदर भाषांचे चार गट पुढीलप्रमाणें तयार होतात - (अ) संश्लिष्ट किंवा चिकाटी( अँग्लुटिनेटिव्ह) भाषावर्ग; या प्रकारच्या भाषांतील शब्दरूपें मूळशब्द व उत्तरगामी प्रत्यय यांच्या बेमालुम मिलाफानें झालेलीं असतात. तुर्की, हंगेरियन व फिनिशयन  वगैरे भाषा या वर्गांत येतात. (आ) दुसरा प्रकार विभक्तियुक्त संश्लिष्ट (अँग्लुटिनेटिव्ह इन्फ्लेक्शनल) भाषांचा; यांत उत्तरगामी प्रत्यय व विभक्ति या दोहोंची जरूरी असते. हिब्रू, अरबी व फिनिशयन या भाषा ह्या प्रकारांत येतात (इ) भाषांचा तिसरा प्रकार म्हटला म्हणजे ज्या भाषांत शब्दरूप विचार पूर्ण झाला नाहीं त्या भाषांचा होय. या भाषांनां पृथक्कृतभाषा (आयसोलेटिंग) असेंहि म्हणतात. चिनी भाषा हें या प्रकारचें उदाहरण आहे. या भाषांत वाक्यांतील स्थानाला विशेष महत्त्व असतें. म्हणजे या जो शब्द क्रियापदाच्या जागीं असेल तो क्रियापद व जो नामाच्या जागीं असेल तो नाम अशी व्यवस्था असते. या भाषांनां धातु-भाषा असेंहि म्हणतात. कारण जे शब्द इतर भाषांत धातु म्हणून गणले जातात ते शब्द या भाषेंत पूर्ण क्रियापपदांच्या जागीं उपयोगांत आणतात (ई) चवथा वर्ग विभत्तियुक्त (इन्फ्लेक्टिव्ह) भाषांचा; ह्या वर्गांत इंडो -युरोपीय व द्रविड भाषा मोडतात. या भाषांची प्रवृत्ति विभक्तींच्या संख्या कमी करण्याकडे आहे. तसेंच शब्दांचे समास करण्याची पद्धति आणि शब्द विभागांतील भेदाभेद नीट पाळण्याचे नियम असल्यामुळें  या भाषा व संश्लिष्ट भाषा कशा भिन्न आहेत हें दिसून येईल.

भाषांची तिसरी विभागणी त्यांच्या उत्पत्तीच्या इतिहासावरून करण्यांत आली आहे. पृथ्वीवर अनेक मानवसमाज असून त्यांच्या भाषा भिन्नभिन्न आहेत. ऐतिहासिक द्दष्ट्या एक विशिष्ट भाषा बोलणारा मानवसमाज संख्यावृद्धीमुळें विभक्त होऊन निरनिराळ्या भूप्रदेशांत राहूं लागतो अशा वेळीं भाषाहि भिन्न होत असतात. याप्रमाणे निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितींमुळें निरनिराळ्या भाषा उत्पन्न झाल्या. इतकेंच नव्हे तर, मानववंशशास्त्राप्रमाणें अखिल मानवजातीचे जे निरनिराळे मानववंश ठरविण्यांत आले आहेत, तदनुसर भाषांचेहि मुख्य वंश असून प्रत्येक वंशांत अनेक निरनिराळ्या भाषा तयार झाल्या असल्याचें दिसून येतें. अशा रीतीनें वंशानुक्रमाच्या तत्त्वावर भाषांचे जे मुख्य विभाग किंवा वंश पडतात. ते येणेंप्रमाणें-

(अ) इंडो-युरोपीय (इंडो-जर्मेनिक)-  हा भाषावंश सर्वांत श्रेष्ठ आहे व त्याचीं कारणें अनेक आहेत. जगाच्या इतिहासांत या वंशांतील भाषा बोलणा-या लोकांकडे पुढारीपणा असल्याचें दिसून येतें. या वंशातील भाषांचीं प्राचीन व अर्वाचीन वाङमयें अनेकगुणसंपन्न व समुद्ध आहेत या भाषांचा ऐतिहासिक कालहि फार मोठा असून व्याकरण व शब्दसंग्रह या द्दष्टीनेंहि या भाषा फार प्रौढ आहेत. या भाषावंशांत (१) आर्यन, (२) आर्मेनियन (३) ग्रीक (४) अल्बेनियन, (५) इटालियन (६) केल्टिक, (७) जर्मानिक, (८) बाल्टोस्लाव्हानिक हे आठ भाषावर्ग येतात. भाषांच्या तौलनिक विचाराच्या योगानें अमुक भाषा इंडोयुरोपीय आहे किंवा नाहीं हें समजणें सोपें झालें आहे. हें बरोबर समजण्यास पुढील गोष्टी लक्षांत ठेविल्या पाहिजेत; (१) या भाषांतील धातू उर्फ प्रातिपदिकें बहुतेक सारखींच असतात (२) नामें, क्रियापदें वगैर शब्दविभागांचीं रूपें सारखींच होतात (३) वाक्यरचनेंतील अन्तर्गत फरक सारखेच असतात (४) तसेंच ज्या भाषांतील सर्वनामें संख्यावाचक नामें हीं सारखींच असतील त्या भाषा निःसंशय इंडो-युरोपीय समजाव्यात. भाषांचा दुसरा वंश (आ) सेमेटिक हा वंश महत्वाच्या द्दष्टीनें दुस-या नंबरचा आहे. कारण या वंशांतील भाषा बोलणारे हिब्रू, फिनिशियन, असीरयिन, सीरयिन अरब अबिसीनियन वगैरे लोकांनीं जगाच्या इतिहासांत दुस-या नंबरची कामगिरी बजाविली असून या वंशांतील भाषांचीं वाङमयेंहि दुस-या नंबरचीं आहेत. या सेमटिक वंशाचा इंडो-यूरोपीय वंशाशीं संबंध आहे कीं काय ह्या प्रश्नाची बरीच चर्चा भाषाशास्त्रज्ञांत चालू आहे. या दोन वंशांतील भाषा बोलणारे लोक गोरे व सुधारलेले आहेत व त्यांचे वस्तीप्रदेशहि भौगालिक द्दष्ट्या जवळ आहेत. तथापि हे दोन भाषावंश मूळ एका आदिभाषेपासून निघाले, असें भाषाशास्त्रांतर्गत पुराव्यावरून सिद्ध होईल असें अद्याप वाटत नाहीं. या भाषावंशांत (१) अरबी, (२) हिब्रु व (३) आर्मेइक हे तीन वर्ग आहेत. तिसरा भाषावंश (इ) हामिटिक- या वंशाला त्यांतील ईजिप्शियन (मिसरी) ह्या एका भाषेमुळें विशेष महत्व आलें आहे. या वंशांतील भाषा बोलणारे लोक उत्तर आफ्रिकेंत भूमध्यसमुद्राच्या किना-यालगत राहतात. या वंशांत (१) प्राचीन ईजिशिप्शयन (मिसरी), व तदुत्पन्न कॅप्टिक भाषा (ही हल्लीं नामशेष झाली आहे); (२) लिबींयन उर्फ बर्बर व (३) इथिओपिक हे मुख्य भाषावर्ग आहेत. हामिटिक भाषा बोलणारे लोक मूळ अशियामधून सुवेझ संयोगीभूमीच्या मार्गानें आफ्रिकेंत शिरले असावे. ईजिशियन लोक उत्तर आफ्रिकेंतील इतर लोकजातीपेक्षां निराळे आहेत यावरूनहि वरील अनुमानास पुष्टि मिळते. चवथा भाषावंश (ई) कॉकेशियन -या वंशांतील भाषा बोलणारे लोक काळासमुद्र व कास्पियनसमुद्र यांच्यामध्यील प्रदेशांत राहातात . या वंशांतले मुख्य भाषावर्ग (१) जॉर्जियन (२) सर्क्याशियन, (३) लेसघियन, (४) चेचेन (५) मिटसजेघियन वगैरे आहेत. पाचंवा भाषावंश (उ) उरल-अल्ताइक (सीथियन, तुरेनियन)-या वंशांतील भाषा बोलणारे लोक मध्य व उत्तर आशिया आणि यूरोपांतील रशिया व स्कँडिनेव्हियांतील अटलांटिक महासागराच्या किना-यापर्यंत पसरलेले आढळतात. या वंशांतील मुख्य भाषावर्ग (१) तुंगुसियन (२) मोंगोल (३) तुर्की (४) सॅमोयेद  व (५) फिनो-हंगेरियन हे आहेत. सुमेरियन, आकेडियन वगैरे चिकाटी भाषा या उरल-अल्ताइक वंशांतल्या आहेत, असें मत पुढें आलें आहे. पण त्याला पुरावा अद्यप फार अनिश्चित आहेत. सहावा भाषावंश (ऊ) द्राविड उर्फ दक्षिण हिंदुस्थानी-हा महत्वाचा आहे. कारण अद्याप ५ कोटी लोक या वंशांतल्या भाषा बोलतात. शिवाय इंडो-युरोपीय भाषा बोलणारे समाज हिंदुस्थान आत्रच्मण करण्यापूर्वीं सर्वच हिंदुस्थानांतील लोक या भाषा बोलणारे होते. भाषावंशाचा इंडो यूरोपीय वंशाशीं मुळींच संबंध नाहीं. उरल-अल्ताइक उर्फ तुरानियन वंशाशीं संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला पण त्यांत यश आलें नाहीं सातवा भाषावंश (ॠ) मलाया-पालीनेशियन हिंदुस्थानांतील सगळे अनार्य लोक द्रविड भाषा बोलणारे नाहींत. त्यांपैकीं संताळ व इतर कांहीं रानटी लोक यांनां कोलेरियन म्हणतात व ते मलाया-पालीनेशियन वंशांतल्या भाषा बोलतात. आशिया, नैर्ऋत्य किना-याजवळचीं लहान मोठीं अनेक बेटें  आणि पॅसिफिक महासागरांतील कांहीं बेटें यांतील लोक मॉन-ख्मेर भाषासमुच्चयाशीं संबंध असलेल्या भाषा बोलतात. आशियाखंडातलें आणि निकोबार बेटांतले कोलेरियन लोकहि याचा भाषा बोलतात. या भाषावंशाचे मलाया व पोलिनेशियन असे दोन मुख्य वर्ग आहेत या वशांतील भाषा उच्चारद्दष्ट्या फार साध्या आहेत. मलाया वाङमय १३ व्या शतकापासूनचें आहे. पण जावा बेटांत ख्रिस्ती शकांरभापासूनचीं लिखाणें आहेत. व तीं तयार होण्याचें श्रेय हिंदुस्थानांतील ब्राह्मणी धर्म व संस्कृति यांच्या त्या बेटांत झालेल्या प्रसाराला आहे. आठवा भाषावंश (ॠ) एकाक्षरी उर्फ आग्नेय आशियाटिक-या भाषावंशालाहि त्यांतील चिनी भाषमुळें फार महत्व आलें आहे. आशियाच्य आग्नेय भागांतील चीन, तिबेट, कोरिया, जपान, अनाम, सयाम वगैरे देशांतील लोक या भाषा बोलतात. यांपैकीं चिनी भाषेंतील वाङमय ख्रिस्तपूर्व २००० वर्षांपासूनचें आहे. या वंशांतील कांहीं भाषांतर चिनी धर्म व संस्कृतीचा आणि कांहीं भाषांवर (तिबेटी, सयामी) हिंदु धर्म व संस्कृतीचा परिणाम झाला आहे. या भाषावंशाची मुख्य गोष्ट म्हणजे त्यांतील सर्व भाषा एकाक्षरी (मॉनोसिलेबिक) व पृथक्कृत (आयसोलेटिंग) आहेत. नववा भाषावर्ग (ए) दक्षिण आफ्रिकी उर्फ बंटु या वंशांतल्या भाषा सर्व दक्षिण आफ्रिकेंतल्या प्रदेशांत (हॅटिंटॉट व बुशमेन यांचा प्रदेश खेरीज करून ) पसरल्या आहेत. या वंशांतील भाषांचें मुख्य लक्षण उपसर्गांची (प्रीफिक्स) विपुलता हें होय. इतर भाषांत नामविभक्तींचीं व धातूंची जीं रूपें प्रत्यय (सफिक्स) लावून होतात तीं रूपें या भाषांत उपसर्ग लावून तयार करतात. दहावा भाषावर्ग (ऐ) मध्यआफ्रिकी - या वंशांत शंभराहून अधिक भाषा असून त्या मध्यआफ्रिकेभर पसरल्या आहेत. तथापि याला एक वंश म्हणतां येत नाहीं, कारण सा सर्व भाषांत कोणतेंहि एक विशिष्ट लक्षण नाहीं. या भाषांचा एका वंशांत समावेश करावा कीं नाहीं याबद्दल भाषाशास्त्रज्ञांत वाद चालू आहे. अकरावा भाषावंश (ओ) अमेरिकन - या वंशांतल्या भाषा उत्तर अमेरिकेंतील इंडियन लोक बोलतात. पण मध्यआफ्रिकी भाषांप्रमाणेंच या भाषाहि एका वशांत घालतां येतील कीं नाहीं याबद्दल शंका आहे. या मुख्य भाषावंशांशिवाय आणखी कांहीं भाषावंश भाषाशास्त्रज्ञ शोधून काढीत आहेत. भाषाशास्त्राशीं संबद्ध अशीं व्याकरणशास्त्र (ग्रामर), व्युपत्ति अथवा शब्दविचारशास्त्र (एटीमॉलोजी) कोशरचनाशास्त्र (लेक्झिकोग्राफी) गूढलिपीशास्त्र (किप्टोलजी), चित्रलिपिशास्त्र (हायरोग्लीफिक्स) प्राचीन लिपिशास्त्र (पॅलीओग्राफी) वर्णनलेखन शास्त्र (फोनोटिक्स), आणि कल्पनादर्शक चिन्हीकरणशास्त्र (इडीओग्राफी) लघुलेखनशास्त्र (स्टेनोग्राफी), इत्यादि शास्त्रें आहेत.

निरनिराळ्या भाषा व त्या बोलणारे लोकसमाज यांच्यासंबंधीं माहिती ज्ञानकोशाच्या अनेक विभागांत आली आहे. पहिल्या विभागांत भारतीय भाषा (प्र.३ रें, पृष्ठें ८३-८७); सिंहली भाषा (प्र. ४ थें, पृष्ठ. १४३-१४९) ब्रह्मदेशीय भाषा (प्र ४ थें, पृ.१५१-१५२); इंडोचीनमधील भाषा (प्र. ५वें , पृ.१७७-१८८); जिप्सी भाषा  (प्र. ८ वे. पृ. २४४-२५०) इत्यादी माहिती दिली आहे. तिस-या विभागांत सर्व भाषावंशाची यादी (प्र.२ रें, पृ.२४) दिली आहे. चवथ्या विभागांत यूरोपांतील प्रांतिक भाषांच्या विकासाची माहिती (प्र. १९, पृ ३८३-४०५) दिली आहे. शिवाय प्रत्येक देशाच्या माहितीमध्यें त्या त्या देशांतील भाषावाङमयाची माहिती दिली आहे. भारतीय भाषाशास्त्रासाठीं ''हिंदुस्थान'' पहा.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .