विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भाबुआ- पो ट वि भा ग व गां व - बंगाल शहाबाद जिल्ह्याच्या पश्चिमेकडील हा पोटविभाग आहे. क्षेत्रफळ १३०१ चौ. मै यांची लो.सं. १९११ सालीं ३०७०८९ होती. या पोटविभागाचे दोन भाग आहेत. उत्तरेकडचा भाग सपाट असून सुपीक आहे. परंतु दक्षिणेकडील भाग टेकड्या, जंगलें व वहीत जमीन कमी असलेला व लोकवस्ती पातळ असलेला असा आहे. या भागांत १२८० खेडीं असून भाबुआ हें मुख्य ठिकाण आहे. लोकसंख्या सुमारें पांच हजार. मुंडेश्वरी नांवाच्या टेंकडीवर हिंदूंचें एक जुनें देवालय आहे.