विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भानुभट्ट- एक भारतीय ज्योतिषी व तत्वज्ञानी. याचा रसायनतंत्र नांवाचा तंत्रग्रंथ आणि 'करणपटतिलक' नांवाचा करणग्रंथ प्रसिद्ध आहे. खंडखाद्याच्या वरूणकृत टीकेंत भानुभट्ट यांच्या ग्रंथांतले कांहीं अनुष्टप् श्लोक घेतले आहेत. खंडखाद्याची वरूणकृतटीका शके ९६२ मधील आहे. यावरून भानुभट्टाचा काळ सुमारें शके ९०० असावा. (दीक्षित कृत भा. ज्योतिःशास्त्र)