विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भानसाळी- यांची वस्ती मुंबई इलाख्यांत असून यांचें दुसरें नांव वेगु असें आहे. त्याचा अर्थ मिश्र जातीचा असा होतो. लोकसंख्या १४०००. कच्छ व काठेवाड या भागांत हे लोक आढळतात. व ते आपण सिंधप्रांतांतून आलों असें सांगतात. व भानुसल म्हणून एक पौराणिक राजा होता त्यापासून 'भानसाळी' शब्दाची व्युपत्ति लावतात. इ. स. १२०० च्या सुमारास लाकपटच्या उत्तरेस रणांत या लोकांचा बेगुगड नांवाचा किल्ला होता. हे आपणास सोळंकी रजपूत म्हणवितात भानसाळी व्यापारी आहेत परंतु शेतीहि करतात. हे लोक शाकाहारी असून ते लुहाणा, खत्री व कायस्थ या लोकांबरोबर जेवतात. सारस्वत ब्राह्मण यांचे उपाध्याय असतात व ते यांचें जेवण जेवतात.