विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भाद्र- राजपुतान बिकानेर संस्थान, रेजी निजामांतीत भाद्र नांवाच्याच तहशिलाचें मुख्य ठिकाण. लोकसंख्या १९०१ सालीं २६५१ होती. या गांवांत एक किल्ला आहे. हल्लींची भाद्र तहशील हा पूर्वीं एका ठाकुराची इस्टेट हाती, पण तो नेहमीं दरबारच्या विरूद्ध बंड करीत असे म्हणून सन १८१८ मध्यें त्याच्याजवळून ती काढून घेतली.