विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भस्मासुर- शिवाच्या भस्मापासून उत्पन्न झालेला असुर. यानें ज्याच्या मस्तकीं हात ठेवावा त्यानें दग्ध व्हावें; असें यास वरप्रदान होतें: परंतु पुढें यानें सर्वांचा छळ आरंभिल्यामुळें विष्णूनें मोहिनीचें रूप घेऊन त्यास स्वत:कडुनच दग्ध करविलें.