प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर   

भरतकाम- कापडावर नक्षी-कशिदा काढण्याच्या कलेला किंवा कांहीं आकृती काढून त्या दो-यांनीं किंवा तारांनीं भरण्याच्या कामाला (उदा० जीगचें काम) भरतकाम म्हणतां येईल. हीं कला शिवण्याच्या कलेइतकीच प्राचीन आहे. वैदिक वाङ्मयांत कशिदा काढलेलें वस्त्र या अर्थीं 'पेशस्' हा शब्द येतो (ॠ. २. ३, ६; ४. ३६, ७; ७. ३४, ११; ४२, १. वाज. सं. १९. ८२; ८९; २०. ४०. ऐत. ब्रा. ३. १० इत्यादि ). पेशस् शब्दाचा अर्थ निरनिराळे टीकाकार निरनिराळा करतात; पण मॅकडोनल्ड आणि कीथ यांच्या मतें नर्तकी वापरीत असलेलें कशिद्याचें वस्त्र असाच या शब्दाचा अर्थ होतो. मेग्यास्थेनीस आणि एरियन यांनीं सुद्धां भारतीयांनां अशा वस्त्रांची आवड असल्याचें नमूद केलेलें आहे. अशीं भरतकाम केलेलीं वस्त्रें तयार करण्याचा वैदिक काळीं बायकांचा एक उघड धंदाच होता असें 'पेशस्-कारी' (कशिदा काढणारी) या यजुर्वेदांतील पुरूषमेधाच्या बलींच्या यादींत आढळणा-या नांवावरून सिद्ध हाते (वेदिक इंडेक्स, २, पृ. २२.). आजसुद्धां काश्मीरच्या वेलबुट्टीच्या शाली फार प्रख्यात आहेत. या शाली काढण्याला सुरवात फार प्राचीन काळीं झालेली आहे. भरतकामाचे उत्कृष्ट नमुने हिंदुस्थानांत सर्वत्र आढळतात.

चीन देश हा रेशमी किड्यांचा मायदेश असल्यानें त्या ठिकाणीं विणकला फार पूर्वीं प्रगत झालीं असणें स्वाभाविक आहे. त्या ठिकाणीं सर्वसाधारणपणें रेशमी भुईवर रेशमीच वेलबुट्टी काढतात. अंगावर घेण्याचीं वस्त्रें, रूमाल, पडदे, निशाणें वगैरे जिन्नसांवर कशिदा असतो. मनुष्याच्या दर्ज्याप्रमाणें त्याच्या झग्यावरील कशिदा असतो. नैसर्गिक देखावे, हवेल्या, राक्षस, सर्प, पक्षी, प्राणी, लाक्षणिक चिन्हें व विशेषतः फुलें हे भरतकामाचे विषय म्हणतां येतील. जपानी कशिदा वरील चिनी कशिद्याप्रमाणेंच असतो. फरक इतकाच कीं, जपानी भरतकाम विशेष चित्रमय व विलक्षण काल्पनिक असून त्याची वीण सैल असते. पुष्कळ वेळां कशिद्यावरून रंगाचा कुंचलाहि फिरवितात. नैसर्गिक देखावे जास्त काळजीपूर्वक व खुलवून काढण्याची पद्धत जपानांत उघड दिसून येते. देवळांतील मोठ्या पडद्यावर विशेष मेहनतीनें कशिदा काढलेला असतो.

सुसा येथें पहिल्या डारायस (ख्रि. पू. ५२१-४८५) याच्या राजवाड्याचे जे अवशेष सांपडले आहेत त्यांवरून प्राचीन इराणी लोकांच्या विणकलेची कांहीं कल्पना येईल. आजहि इराणांत प्रार्थनेच्या किंवा स्नानाच्या वेळच्या गालिच्यांवरून फारकरून उत्कृष्ट कशिदा काढलेला दिसतो त्याचप्रमाणें उपवस्त्रें, पडदे, टेबलावरील वस्त्रें, दरवाजांतील पडदे हेहि नक्षीदार असतांत. ही नक्षी विशेषतः फुलवेलांची असतें. कधी कधीं शिकारीचे देखावेहि भरलेले आढळतात. केरमनच्या कशिद्याच्या शाली प्रख्यात आहेतच. रेश्त, इस्पाहान यासारख्या ठिकाणीं उत्तम नक्षीचे रूमाल व पडदे होतात.

तुर्कस्तानांत, विशेषतः बुखा-यास प्राचीन काळापासून अत्युत्कृष्ट भरतकाम होत आलेलें आहे. कांहीं कशिदा उठावदार फुलबुट्टीचा, तर कांहीं आंकड्याप्रमाणें किंवा करवतीच्या दांत्यांप्रमाणें रेखांकित असतो. या कशिद्याला बहुधां भडक रंगाचें रेशीम वापरतात. सुती  भुईवर बहुतेक तांबडी नक्षी दिसून येते. उत्तर आफ्रिकेंत मोरोक्को व अल्जेरिया हे देश या कामीं नांव घेण्यासारखे आहेत. मोरोक्कोचा कशिदा बहुधां भूमितींतील आकृतीचा तर अल्जेरियाचा फुलबुट्टीचा असतो. प्राचीन ईजिप्तमधील कशिद्याचें नमुने उपलब्ध आहेत. १९०३ सालीं थेबेस येथें चवथ्या तेथमॉसिस (ख्रि. पू. १५ वें शतक) याच्या थडग्यांत जो भरतकामाचा नमुना आढळला आहे तो अतिशय महत्त्वाचा व सर्वांत जुना असा आहे (तो सध्यां केरोम्युझियममध्यें आहे.). हा सर्व सुती असून, निळ्या, तांबड्या, हिरव्या  व काळ्या रंगांचा  त्यावर कशिदा आहे. या नमुन्यांच्या एका तुकड्यावर (एकंदर तीन तुकडे सांपडले आहेत) कमळें व पापीरस पुष्पांची मांडणी केलेली आहे.

भरतकामांत ग्रीक लोक किती पुढारलेले होते याची त्यांच्या अवशिष्ट वाङ्मयावरून कायती कल्पना येते. दर पांच वर्षांनीं अथीना देवतेची मूर्ति झांकण्याकरितां जें 'पेप्लॉस' वस्त्र तयार करीत असत त्यावर देवदानवांमधील लढायांचीं चित्रें काढलेलीं असत. व हीं चित्रें बहुतेक कशिद्याचीं असत असें डॉ. ज एच्. मिडलटन म्हणतो. क्रिमियांतील कांहीं थडग्यांतून ग्रीकांच्या प्राचीन भरतकामाचे अवशेष सांपडले आहेत. प्राचीन रोमन कलेसंबंधीं माहिती प्लिनीनें दिलेली आहे (नॅच. हिस्टरी ८.). पर्ग्याममचा राजा दुसरा अटालस (ख्रिस्वपूर्व १५९-१३८) यानें जीगच्या कलेचें संशोधन केलें व त्याच्या नांवावरून सोन्याची नक्षी (जीग) केलेल्या वस्त्रांनां 'अटालिक' वस्त्रें असें नांव पडलें. प्लिनी अशीहि माहिती देतो कीं बाबिलोन हें भरतकामाचें केंद्रस्थान होतें. रोमन भरतकामाचे प्राचीन नमुने रोमच्या आसपास सांपडत नसून ईजिप्तमध्यें थडग्यांत ममीभोंवतीं गुंडाळलेले आढळतात. माणसांच्या आकृती, प्राणी, पक्षी, भूमितीविषयक नक्षी, भांडीं, फळें, वेली, फुलें इत्यादि वस्तू या रोमन कशिद्यांत अंतर्भूत होत. बायबलमधील प्रसंगहि क्वचित काढलेले आहेत.

जस्टिनियनच्या काळापासून पुढें कांहीं शतकेंपर्यंत यूरोपच्या इतर काळाबरोबर हीहि कला बायझान्टाईन साम्राज्याच्या तडाक्यांत सांपडली. तेथें तिला एक विशिष्ट व प्रगति खुंटविणारें वळण मिळालें. हें वळण स. १२०४ त जेव्हां कॉन्स्टांटिनोपल लॅटिन अमलाखालीं आलें तेव्हांपासून मंदावत चाललें. पण अद्यापहि माऊंट अँथोससारख्या कांहीं भागांत जीव धरून आहे. या बिझान्शियन वळणाचा नमुना म्हणजे रोम येथें सेंटपीटर देवालयांत ठेविलेला तिस-या लिओचा 'डॅल्मॅटिक' अंगरखा होय. यावर पुढील बाजूस जगाचा न्यायाधीश म्हणून ख्रिस्त सिंहासनावर विराजमान झाला आहे व मागें ख्रिस्ताचे रूपांतरप्रसंग काढिले आहेत (काल सुमारें १२ वें शतक).

यूरोपांतील कलांचें केंद्रस्थान हा बिझान्टाईनचा मान यानंतर सिसिलींतील पालेर्मो शहराकडे गेला. सिसिली नॉर्मन राजांच्या अमलाखालीं असतांना या कलेचें वळण बरेचसें पौरस्त्त्य होतें. पण पालेर्मोचें वर्चस्व फार दिवस टिकलें नाहीं. १२ व्या शतकाच्या अखेरीस निरनिराळ्या राष्ट्रांचीं निरनिराळीं वळणें पडत गेलीं. मध्ययुगांत या कलेला बराच जोर चढला व तिचें कार्य विशेषतः धार्मिक होतें.

इंग्लंडमध्यें ही कला फार दिवसांपासूनची असून सर्व दर्जाचे लोक फावल्यावेळीं सुया घेऊन विणीत बसत. इंग्लंडवर नॉर्मन लोकांनीं मिळविलेल्या विजयाचें कथानक एका २३० हून अधिक फूट लांब असलेल्या सुती पडद्यावर लोंकरीच्या निरनिराळ्या रंगांत कशिद्याप्रमाणें काढलेलें आहे. त्याला 'बेयू टॅपेस्ट्रो' म्हणतात (काळ ११ वें  शतक). सोनें, चांदी यांसारख्या धातूमध्यें केलेलें जुनें भरतकामहि आढळतें. १३ व्या शतकांतील इंग्लिश कला सर्व पश्चिम यूरोपांत प्रख्यात होती. १४ व्या व १५ व्या शतकांतील देवस्थानविषयक भरतकामाचे नमुने चांगले आढळत असून ट्यूडर राजांच्या कारकीर्दींत बड्या लोकांचे कपडे उत्कृष्ट कशिदा. काढले  असत असें निश्चित होतें. सुती कापडावर काळ्या रेशमाचा कशिदा एलिझाबेथच्या वेळीं लोकांच्या आवडीचा होता. त्याला 'कृष्ण कला' (ब्लॅक वर्क) असें नांव होतें. कॅनव्हाससारख्या जाळीदार कापडावर रेशीम व लोंकर भरण्याची कलाहि त्या काळीं लोकप्रिय होती. १७ व्या व १८ व्या शतकांतील भरतकाम पुष्कळ वेळां सदभिरूचीला सोडून असलें तरी कमी दर्जाचें नव्हतें.

इतर सर्व ललितकलांप्रमाणें फ्रान्समध्यें ही कलाहि डौलदार व सुंदर अशीच मूळापासून होती. येथील बहुतेक नक्षी फुलबुट्टीची असून पोषाख, देवस्थानांतील वस्त्रें, पडदे, तसेंच खुर्च्यांच्या गांद्या व पाठी यांवर ती काढलेली दिसे. १५ व्या शतकांत बर्गंडीच्या ड्यूकांच्या कारकीर्दींत नेदर्लंडमध्यें ही कला उत्कर्षास चढली. रंगीत चित्रांवरून हुबेहुब भरतकाम करण्यांत येत असे. नेदर्लंडचें भरतकाम सर्व जगांत अतिशय सुरेख म्हणून प्रख्यात असे. १६ व्या शतकाच्या अखेरीस डच लोकांनीं ईस्ट इंडिज पादाक्रांत केल्यामुळें हॉलंडच्या या कलेवर बराच परिणाम झाल्यावांचून राहिला नाहीं. कारण त्यावेळीं पूर्वेकडून हॉलंडमध्यें भरत कामाच्या जिन्नसा येण्याला सुरवात झाली. इटलींत १४ व्या शतकापर्यंत नांव घेण्यासारखें भरतकाम नव्हतेंच पण त्या शतकांत तें फारच उत्कृष्ट तयार होऊं लागलें.

स्पेनद्वीपकल्पांत ८ व्या शतकापासून १५ व्या शतकाच्या अखेरपर्यंत अरबांचें वर्चस्व असल्यानें त्या कालांतील कलाहि बव्हंशीं अरबी म्हणतां येईल. १५ व्या व १६ व्या शतकांत तीवर इटालियन वर्चस्व दिसूं लागलें. पुढें आशियाखंडांतील पोर्तुगीजांच्या वसाहतीमुळें या कलेला तिकडील पाणी लागलें. भरतखंडामध्यें तयार होणा-या मोठमोठ्या भरतकामाच्या जिन्नसांवर पौरस्त्य फुलबुट्टीमध्यें यूरोपीय व्यक्ती, नावा व लष्करी चिन्हें पाहण्यास मिळूं लागलीं. व याच्या उलट पोर्तुगॉलमध्यें १६ व्या व १७ व्या शतकांत तयार झालेल्या भरतकामांत पौरस्त्य छटा विलसूं लागली.

१२ व्या व १३ व्या शतकांतील जर्मनीचें भरतकाम बिझान्शियम वळणाचें असें. मध्ययुगांतील कामाचा एक नमुना म्हणजे सैल सुती भुईवर पांढ-या सुती दो-यानें विणणें किंवा रफूकाम करणें यासारखें होय. कशिद्याचा विषय समजून सांगण्याकरितां विणलेले लेख ज्यावर आहेत अशी लांबच्यालांब नक्षीचीं गुंडाळी तयार करण्याचें वैशिष्ट्य विशेषेंकरून एकट्या जर्मनींतच आढळून येतें. १५ व्या शतकांत कोलोनच्या आसपासचें भरतकाम विशेष सुंदर होतें. यापुढें जर्मन कशिद्याच्या कामांत उठावदार फुलबुट्टी आढळून येते. मोठीं कशिद्याचीं कामें लोंकरी कापडावर लोंकरीनें तयार केलेलीं आहेत. डेन्मार्क, स्कॅन्डिनेव्हिया, आईसलंड वगैरे उत्तरेकडील राष्ट्रांतील ही कला दक्षिणेकडच्या कलेपेक्षां बरीच अर्वाचीन आहे. (बार्बर-सम ड्राइंग्स ऑफ एन्शंट एम्ब्राइडरी; मिसेस ख्रिस्ती- एम्ब्राइडरी अँड टॅपेस्ट्री वीव्हिंग; केंड्रिक-इंग्लिश एम्ब्राइडरी; लेडी अलफोर्ड-नीडलवर्क अँज आर्ट; कोल-''सम अँस्पेक्ट्स ऑफ एन्शंट अँड मॉडर्न एम्ब्राइडरी; (ज. ओ. सोसायटी ऑफ आर्टस पु. ३).)

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .