विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भट्टीप्रोलू- मद्रास इलाखा, गंतूर जिल्ह्यांतील तेन्नाली तालुक्यांतील हें एक खेडें आहे. येथें एक संगमरवरी बुद्धाचा स्तूप होता. यांत कांहीं रत्नें व बुद्धाचे अवशेष सांपडले असें यावरील पाली लेखावरून समजतें. या लेखाचें अशोककालीन लेखांशीं बरेंच साम्य आहे. दक्षिणेंतील ख्रि. पू. शिलालेख असा हा व म्हैसूरचा एवढेच आहेत. (बार्थ- जर्नल डेस सावंत्स. आक्टोबर १९१६.)