विभाग आठरावा : बडोदें ते मूर
भटिंडा (गोविंदगड)- पंजाब, पतियाळा संस्थानांत अनाहदगड निझामतींत गोविंदगड तहशिलीचें मुख्य गांव. लोकसंख्या सुमारें पंधरा हजार. ह्यास विक्रमगड असें प्राचीन काळीं म्हणत असत. बिकानेर संस्थानच्या मूळ पुरूषानें हें वसविलें असें म्हणतात. एके काळी हें भट्टी लोकांच्या राज्यांत मोडत असें. १८५४ सालीं पतियाळच्या महाराजानें हें जिंकून घेतलें. येथें एक मोठा किल्ला आहे. त्यास ३६ बुरूज आहेत.