विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्राह्मणबाद- (सिंधी नांव बुंब्रा केथूल) सिंधमधील थर व पार्कर जिल्ह्याच्या सिंझोरी तालुक्यांतील एक प्राचीन पण आज नष्ट झालेलें शहर. हें ११ व्या शतकांत सिंधु नदीच्या पूर्वींच्या प्रवाहाच्या किना-यावर तटबंदीचें व भरभराटींचें शहर होतें. शिकंदरच्या इतिहासकारांनीं वर्णिलेलें ब्राह्मणांचे शहर तें हेंच असावें. डायाडोरसचें हर्म टेलिया म्हणजे ब्राह्मणाबादच असें दिसतें. दाहीरनें याला महत्त्वास चढविलें असावें. हें भूकंपासारख्या कांहीं आधिदैविक क्षोभामुळें एकदम जमिनींत जसेंच्या तसेंच गाडलें गेलें. याविषयीं चमत्कारिक दंतकथा आहे.