विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रायटन- इंग्लंड, एक बरो. हें समुद्रकांठचें हवा खाण्याचें एक ठिकाण आहे. १९२१ सालीं येथील लोकसंख्या १४२४२७ होती. सेंट निकोलस प्रार्थनामंदिरांत ड्यूक ऑफ वेलिंग्टनचें स्मारक आहे. पॅव्हिलियन इमारतींत पदार्थसंग्रहालय व चित्रांचीं दालनें आहेत. एका इमारतींत सर्व सजीव जलचर प्राणी पाण्यांत ठेवले आहेत आणि एका इमारतींत सर्व जातींचे पक्षी आहेत.