विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रह्म- क्षत्री– हे मुंबई इलाख्यांत (लोकसंख्या सुमारें ५ हजार) व बडोदें संस्थानांत (सु. १ हजार) आढळतात. हे क्षत्रिय असून पंजाबप्रांतांतून गुजराथेंत आलेले आहेत. कारण पंजाबांतील ब्रह्मक्षत्री लोकांचे व यांचे रीतिरिवाज जवळ जवळ सारखे आहेत. या लोकांचे उपाध्याय सारस्वत ब्राह्मण आहेत. ब्रह्मक्षत्रींपैकीं कांहीं जिल्ह्याचें अधिकारी, कांहीं वकील, व कांहीं सावकार आहते. या लोकांत खास ब्रह्मक्षत्री, दास, पंच, नात्रबळ व चुडागर असें पांच पोटभेद असून एका पोटाभेदांतील लोक दुस-या पोटभेदांतील लोकांशीं रोटी व बेटीव्यवहसार करीत नाहींत. नात्रवळ व चुडागर हीं नांवें धंद्यावरून पडलेलीं असून, नात्रबळ लोक मूर्तींचे डोळे व चुडागर लोक बांगड्या करतात. यांच्यांत जातिपंचायती नाहींत.