प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग आठरावा : बडोदें ते मूर  

ब्रह्मदेश– हिंदुस्थानच्या पूर्वेकडील एक प्रांत. या प्रांताच्या वायव्येस आसाम, ईशान्येस चीन, पश्चिमेस व नैॠत्त्येस बंगालचा उपसागर आणि आग्रेयीस सयाम आहे. १९१४ सालीं बनविलेला पुटाओ जिल्हा धरून या प्रांताचें क्षेत्रफळ २६३००० चौरस मैल असून त्यांपैकीं १८४००० चौरस मैल प्रदेश ब्रिटिश अमलाखालीं आहे, ६३००० चौरस मैल अर्धवट स्वतंत्र असलेल्या संस्थानिकांच्या अंमलाखालीं आहे. आणि बाकींच्यावर कोणाचाहि अंमल नाहीं. ह्या प्रांताचा भौगोलिक विशेष हा आहे कीं, त्यांत उत्तरेकडून दक्षिणेकडे वहाणा-या अशा ब-याच नद्या असून त्यांच्या कांठचा प्रदेश चांगला सुपीक आहे. प्रदेशाच्या ऊंचसखलमानाप्रमाणें आणि पर्जन्याच्या भिन्न प्रमाणामुळें ठिकठिकाणच्या हवामानांत फार फरक आहे. आराकान आणि तेनासरीम ह्या समुद्रकांठच्या प्रदेशांत पाऊस दोनशें इंचांहून अधिक पडतो आणि आंतल्या नदीकांठच्या प्रदेशांत त्याच्या निम्म्याहूनहि कमी पडतो. उन्हाळा फार थोडें दिवस असतो व पावसाळ्यास फार लवकर सुरवात होतें. कमाल उष्णमान ९६० असून किमान६०० असतें.

उत्तरभागांत पाऊस तीस इंच पडतो. पण त्या भागांत थंडी अधिक पडते. उत्तरेकडे काचीन आणि शान हा पठारांचा प्रदेश तीन हजार फूट उंच आहे व त्यांतील कित्येक शिखरें नऊ हजार फूट उंच आहेत. त्यामुळें तिकडील हवा समशीतोष्ण असून पाऊस सत्तर इंच पडतो. हा पठाराचा प्रदेश  युरोपीय लोकांच्या वसाहतीला जितका उत्तम आहे तितका ब्रिटिश साम्राज्यांत कोठेंहि नाहीं. मोठाल्या नद्या, बाजूला टेकडयांच्या रांगा आणि पुष्कळ अरण्यें यांमुळें ब्रह्मदेशाची सृष्टिशोभा फारच विविध व अवर्णनीय बनली आहे.

लो क.– ब्रह्मदेशाची लोकसंख्या (१९२१) १३१६९०९९ आहे; पैकीं ८३,३२,३३५ ब्रह्मी, १०,१७,९८७ शान, १२,२०,३५६ करेण, १,४६,८४५ काचीन, २,८८,८४७ चिनी, ३,००,७०० आराकानी आणि ३,२३,५०९ तलैंग आहेत. याशिवाय परकी चिनी लोकांची १४९०६०, आणि हिंदी लोकांची ८८७०७७ इतकी वस्ती आहे.  आणि यूरोपीय व आंग्लो –इंडियन लोकांची संख्या २५००५ आहे. सर्वांत अधिक लोकसंख्या असलेले ब्रह्मी लोक तिबेटी वंशांतलें असून त्यांची भाषा तिबेटी चिनी वर्गापैकीं आहे. यांच्यापैकीं शेंकडा ८० लोक शेतकरी आहेत. ब्रह्मी लोक आणि टेकड्यांवर राहाणा-या बहुतेक  जाती बौद्धधर्मी आहत. पण त्यांच्यामध्यें प्राणिपूजा आणि पिशाच्चपूजा प्रचलित आहे. त्यांनीं गेल्या युद्धांत केलेंली सैन्यभरती व द्रव्यसाहाय्य आणि इतर धर्मार्थ संस्थांच्या फंडाला मदत यांवरून हे लोक ब्रिटिश सत्तेशीं अधिकाधिक राजनिष्टेनें वागूं लागलें आहेत असें दिसतें. ब्रह्मी लोक दिसण्यांत ठेंगू, पण अंगानें जाडेजुडे असतांत. व त्यांची शारीरिक ठेवण मंगोलियन लोकांप्रमाणें असतें. त्यांचा पोषाख अगदीं स्वतंत्र पद्धतीचा असून फारच सुखकर असतो. ते डोक्याभोंवतीं रेशमी हातरूमाल गुंडाळतात, अंगांत सैल जाकीट घालतात व कमरेभोंवतीं टांचेपर्यंत लांब असलेली लुंगी (लहंगा) वापरतात. ब्रह्मी स्त्रिया एकंदर पौरस्त्य स्त्रीजातीमध्यें अत्यंत मनोवेधक असून त्यांनां  पूर्ण स्वातंत्र्य असतें. बारीक सारीक उद्योगधंदे स्त्रियाच करतात. त्याचा पोषाख डोक्याच्या रूमालाखेरीज पुरूषांप्रमाणेंच असतो. मात्र त्या लुंगीची गांठ पुढल्या बाजूस न बांधतां दोन्हीं बाजूंनां टोकें खोंचतात. चांगला पोषाख केलेंली आणि चांगलीं स्वच्छता राखणारी ब्रह्मी स्त्री नीटनेटकेपणांत आणि आकर्षकपणांत जगांतील कोणत्याहि स्त्रीपेक्षां कमी सुंदर प्रतीची ठरणार नाहीं.

द ळ ण व ळ ण आ णि उ द्यो ग धं दे.– इरावती आणि चिद्विन या दोन नद्या दळणावळणाचीं मोठी साधनें आहेत. त्यांमधून सर्व वर्षभर जहाजें व बोटी चालूं शकतात. हा बोटी चालविण्याचा धंदा इरावती फ्लोटिला कंपनी करते. वर्मा रेल्वे कंपनीनें १६६८ मैल आगगाडीचे रस्ते बांधले आहेत. रंगून ते मंडाले, सगईंग ते म्यिुट्टक्यीन, रंगून ते प्रोम , पेगू ते मार्ताबान हे रेल्वेचे मुख्य फांटे आहेत. शेतकी हा मुख्य धंदा आहे व  त्यावर ३/४लोकांचा उदरनिर्वाह होतो. शेतकीमध्यें १५५०००० एकर जमीन गुंतली असून त्यांपैकीं  निम्म्याहून अधिक भागांत एकाहून अधिक पिकें होतात. कालव्याचें पाणी पंधरा लक्ष एकर जमिनीस मिळतें. शिवाय केरोसीन, बेन्झिन आणि पेट्रोल ह्यांचा हिंदुस्थानाला पुरवठा पुष्कळ, अंशीं ब्रह्मदेशांतून होतो. व सर्वांत अधिक पुरवठा तांदुळाचा होतो. तसेंच ब्रह्मदेशांतील  सागाचा पुरवठाहि हिंदुस्थानास पुष्कळ होतो. या प्रांतांतील जंगलाचा उद्योगधंद्याला फार मोठा उपयोग होतो. येथें तीस हजार चौरस मैल 'राखीव जंगल’ असून इतर जंगल सुमारें ११५००० चौरस मैल आहे. सरकारला दरसाल १०७००० टन लांकूड मिळतें आणि बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन, स्टील ब्रदर्स वगैरे कंपन्या ३४४००० हून अधिक लांकूड  दरसाल पैदा करतात. याशिवाय सरकारी परवाना मिळविणारे कारखानदार ४३१००० टन इमारती लांकूड आणि ८२४००० टन जळाऊ लांकूड संरक्षित जंगलांतून काढतात. कथील, लोखंड, मँगॅनीझ व वॉलफ्रॅम या धातू तव्हॉय आणि मेरगुई जिल्ह्यांत खाणींतून काढण्याचा धंदा महायुद्धकालीं फार वाढला होता. युद्धानंतर व लफ्रॅमला मागणी कमी झालीं आणि जस्ताच्या किंमतींत फार चलबिचल झालीं म्हणून अलीकडे ह्या धंद्यांनां उत्तेजन देण्याकरितां स्थानिक सरकारनें १९२१ सालीं मदत करण्याची योजना केली ती १९२३ सालीं बंद झालीं. शन १९२१ ते १९२३ या सालांत सरकारनें फी, भाडें व सरकारी कर (रॉयल्टी) या बाबतींतहि बरीच माफी दिली. इतक्या सवलती दिल्या तरी ब-याचा खाणी बंद पडल्या रूपें, शिसें आणि जस्त या धातू बर्मा कॉर्पोरेशन, उत्तर शान संस्थानांतील बौडि्वन येथील खाणींतून काढतें. तांबें थोड्या प्रमाणांत सर्वत्र सांपडतें. मोलीबडेनाईट ही धातु तव्हॉय आणि मेरगुई या जिल्ह्यांत थोड्या प्रमाणांत सांपडते आणि प्लातिन धातु म्यितकिन् जिल्ह्यांत सांपडते. माणकाच्या खाणींतूनहि हल्लीं माल कमी सांपडूं लागला आहे. म्यितक्यीन जिल्ह्यांत सोनें काढण्याच्या धंद्यांत अलीकडे तोट येऊं लागल्यामुळें सदरहू धंदा करणारी कपंनी मोडली आहे. ह्यू काँग दरींतील खाणींतून मर्गझ आणि तैलस्फटिक (अंबर) खणून काढतात. माग्वे जिल्ह्यांत येनन् ग्यौंग येथें तेल सांपडणारा प्रदेश  सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा आहे, व तेथेंच बर्मा ऑईल कंपनीच्या मुख्य विहिरी आहेत. अलीकडे केलेंल्या खोदणीवरून (बोअरिंग) तेलाचा साठा इतर जिल्ह्यांतहि सर्वत्र आहे असें आढळून आलें आहे. पकोक्कू व मिनबू या जिल्ह्यांत तेलाचें क्षेत्र लहान असलें तरी त्यांतून तेलाचा पुरवठा अलीकडे बरीच अधिक होऊं लागला आहे. आणि थ्येतम्यों जिल्ह्यांत खणलेल्या विहिरींतून होणारा तेलाचा पुरवठा समाधानकारक आहे. एकंदर तेलाच्या पुरवठ्यापैकीं २/३ पुरवठा येननग्यौंग जिल्ह्यांतील तैलक्षेत्रांतून होतो. ७९००० एकर जमिनींत रबराची लागवड करतात.

का र खा ने.- ह्या देशांत ८८२ कारखाने आहेत. त्यांपैकीं ३/५ भात सडण्याचे असून १/६ लांकूड कापण्याचे कारखाने आहेत. व बाकीचे कारखाने कापूस कांतण्याचे आणि पेट्रोलियम तयार करण्याचे आहेत. या सर्व कारखान्यांत मिळून मजुरांची सरासरी संख्या ८९००० असतें.

ब्रिटिश साम्राज्यांत यांत्रिक कारखाने वाढत आहेत, तरी ब्रह्मदेशांत मंडाले जिल्ह्यांतील अमरपुरा येथें हातविणीचें रेशमी कापड विणण्याची प्रवृत्ति वाढत आहे. तसेंच लांकूड आणि चांदी यावंर हातानें नक्षीकाम करण्याच्या धंद्याकरतां ब्रह्मदेश विशेष प्रसिद्ध आहे. बासीन आणि मंडाले येथें तयार होणा-या नाजुक छत्र्या सर्व ब्रह्मदेशांत प्रसिद्ध आहेत. बांबूवर तांबड्या, पिवळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाच्या लाखेचें हातानें केलेंलें काम यांकरितां ब्रह्मदेशाची फार प्रसिद्धि आहे.

रा ज्य का र भा र.- पूर्वीं ब्रह्मदेशावर लेफ्टनंट गव्हर्नर हा मुख्य अधिकारी असें. १९१९ च्या सुधारणेच्या कायद्यांतून ब्रह्मदेश हा तेथील परिस्थिति विशेष भिन्न प्रकारचीं असल्यामुळें वगळण्यांत आला होता. नंतर नेमलेल्या बर्मा रिफॉम्स कमिटीनें सदरहू सुधारणांच्या कायद्यांतील महत्त्वाचीं कलमें ब्रह्मदेशालाहि लागू करावी असें मत इ. स. १९२२ मध्यें दिल्यामुळें तदनुसार कायदा करूंन ब्रह्मदेशावर गव्हर्नर नेमण्यांत आला आणि एक्झिक्युटिव्ह कौन्सिल आणि प्रांतिक कायदेकौन्सिल १९१९ च्या कायद्याप्रमाणेंच बनविण्यांत येऊन कारभाराची राखीव आणि सोंपीव अशी खातेवार विभागणी करूंन सोंपीव खात्यावर दिवाण नेमण्यांत आले. कायदेकौन्सिलांत १०४ सभासद असून त्यापैकीं ७९ लोकनियुक्त आहेत आणि स्त्रियांनां मतदानाचा हक्क देण्यांत आला आहे. ब्रह्मदेशाचे 'अपर बर्मा' आणि 'लोअर बर्मा' असें दोन भाग आहेत. अपर बर्मामध्यें शान संस्थानाचा अन्तर्भाव होत असून संस्थानिकावर देखरेख करण्याकरितां 'कमिशनर' हा अधिकारी आहे. दक्षिण आणि उत्तर शान संस्थानाचें मिळून एक संयुक्त राज्य (फेडरेशन) इ. स. १९२२ मध्यें बनविण्यांत आलें. दिवाणी, फौजदारी आणि मुलकी अधिकार संस्थानिकांनां दिलेले आहेत. अपर बर्माचे तीन आणि लोअर बर्माचे पांच मिळून ब्रह्मदेशाचे आठ विभाग असून त्यांवर गव्हर्नरच्या हाताखालीं आठ कमिशनर नेमले आहेत. रंगून येथें हायकोर्ट असून त्याच्या नियंत्रणाखालीं दिवाणी अगर फौजदारी खटले चालविणारीं कोर्टें आहेत. हायकोर्टोंत चीफ जस्टिस व आणखी सात जज्ज आहेत. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट’ वर दोन चीफ इंजिनियर, त्यांच्या हाताखालीं नऊ सुपरिंटेंडिंग इंजिनियर व ७९ एक्यिक्युटिव्ह इंजिनियर आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत.

पोलीसखात्यांत सिव्हिल, मिलिटरी व टाउन पोलीस असें तीन प्रकार असून त्यांवर इन्स्पेक्टर जनरल, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, कमिशनर वगैरे अधिकारी आहेत. लष्करी पोलिसांवरील अधिकारी इंडियन आर्मीमधून नेमण्यांत येतात. आणि पोलिसांत भरतीहि हिदुस्थानांतील लोकांची करतात. तथापि काचीन, करेण व शान लोकांपैकीं कांहीं लष्करी पोलिसांमध्यें नोकर आहेत. लष्करी पोलीसविभाग ठेवण्याचा हेतु ब्रह्मदेशांतील खास लष्करला मदत व्हावी हा आहे. याशिवाय खजिने, तुरूंग आणि कोर्टे यांवर पहारा करण्याचें काम या पोलिसांकडेच असतें. शिक्षणाखात्यावर मुख्य अधिकारी डिरेक्टर, असिस्टंट डिरेक्टर, इन्स्पेक्टर व असिस्टंट इन्स्पेक्टर हे आहेत. 'बर्मा युनिव्हर्सिटि' रंगून येथें आहे. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा ब्रह्मदेशांतील शिक्षणाचा विशेष होय. ही व्यवस्था केवळ लोकांच्या विशिष्ट धार्मिक भावनेमुळें झालीं आहे. बहुधां प्रत्येक खेड्यांत बौद्ध भिक्षूंचा मठ असतो. आणि हा प्रत्येक मठ                खेडेगावांतील शाळा होय. ब्रह्मी लोकांच्या धर्मसमजुतीप्रमाणें प्रत्येक ब्रह्मी मुलानें शाळेंत गेलेंच पाहिजे असा नियम आहे. या शाळांत लिहिणें, वाचणें आणि प्राथमिक अंकगणित हे विषय शिकविले जातात. या पद्धतीमुळें ब्रह्मदेशांत निरक्षर मुलें फारच थोडीं आढळतात. वैद्यक खात्यावर मुख्य अधिकारी इन्स्पेक्टर जनरल असून त्याच्या हाताखालीं ४१ सिव्हिल सर्जन आहेत. सार्वजनिक  आरोग्याच्या खात्यावर १ डायरेक्टर आणि २ असिस्टंट डायरेक्टर हे अधिकारी आहेत.  तुरूंगाच्या देखरेखीकरतां एक इन्स्पेक्टर जनरल आणि तीन सुपरिटेंन्डेंट आहेत. शिवाय केमिकल एक्झॅमिनर, बॅक्टिरिऑलॉजिस्ट, आणि वेड्यांच्या इस्पितळांचा सुपरिटेंडेंट हे अधिकारी आहेत. इ .स. १९१५ मध्यें रंगून येथें 'पाश्चूर इन्स्टिट्यूट' उघडण्यांत आली आहे. ब्रह्मदेशाचें एकूण वार्षिक उत्पन्न १९२४-२५ च्या अंदाजपत्रकाप्रमाणें ९००९६००० इतकें असून एकूण खर्च रू. १३३७०१००० इतका होता. शेतसारा ही सर्वांत अधिक उत्पन्नाची बाब आहे.

   

खंड १८ : बडोदे - मूर  

 

 

 

  बदकें
  बदक्शान
  बंदनिके
  बंदर
  बदाउन
  बदाम
  बदामी
  बदौनी
  बद्धकोष्ठता
  बद्रिनाथ
  बनजिग
  बनारस
  बनास
  बनिया
  बनूर
  बनेड
  बनेरा
  बन्नू
  बफलो
  बब्रुवाहन
  बयाना
  बयाबाई रामदासी
  बरगांव
  बरद्वान
  बरनाळ
  बरपाली
  बरहामपूर
  बराकपूर
  बरांबा
  बरिपाडा
  बरी साद्री
  बरेंद्र
  बरेली
  बॅरोटसेलॅंड
  बरौंध
  बर्क, एडमंड
  बर्झेलियस
  बर्थेलो
  बर्थोले
  बर्न
  बर्नार्ड, सेंट
  बर्नियर, फ्रान्सिस
  बर्न्स
  बर्बर
  बर्मिगहॅम
  बर्लिन
  ब-हाणपूर
  ब-हानगर
  बलबगड
  बलराम
  बलरामपूर
  बलसाड
  बलसान
  बलसोर
  बलि
  बलिजा
  बलिया
  बली
  बलुचिस्तान
  बलुतेदार
  बल्गेरिया
  बल्ख
  बल्लारी
  बल्लाळपूर
  बव्हेरिया
  बशहर
  बसरा
  बसव
  बसवापट्टण
  बसार
  बॅसुटोलंड
  बसेन
  बस्तर
  बस्ती
  बहरैच
  बहाई पंथ
  बहादूरगड
  बहादुरशहा
  बहामनी उर्फ ब्राह्मणी राज्य
  बहामा बेटें
  बहावलपूर
  बहिणाबाई
  बहिरवगड
  बहिरा
  बहुरुपकता
  बहुरुपी
  बहुसुखवाद
  बॉइल, राबर्ट
  बांकीपूर
  बांकु
  बांकुरा
  बांगरमी
  बागलकोट
  बागलाण
  बागेवाडी
  बाघ
  बाघपत
  बाघल
  बाघेलखंड
  बाजबहादूर
  बाजरी
  बाजी पासलकर
  बाजी प्रभू देशपांडे
  बाजी भीवराव रेटरेकर
  बाजीराव बल्लाळ पेशवे
  बाटुम
  बांडा
  बाणराजे
  बांतवा
  बादरायण
  बांदा
  बानर्जी सर सुरेंद्रनाथ
  बाप्पा रावळ
  बार्फिडा
  बाबर
  बाबिलोन
  बाबिलोनिया
  बांबू
  बाबूजी नाईक जोशी
  बाभूळ
  बाभ्रा
  बायकल सरोवर
  बायजाबाई शिंदे
  बायरन, जॉर्ज गॉर्डन
  बायलर
  बारगड
  बारण
  बारपेटा
  बारबरटन
  बारबरी
  बारमूळ
  बारमेर
  बारवल
  बारसिलोना
  बाराबंकी
  बारामती
  बारा मावळें
  बारिया संस्थान
  बारिसाल
  बारी
  बार्कां
  बार्डोली
  बार्बाडोज
  बार्लो, सर जॉर्ज
  बार्शी
  बालकंपवातरोग
  बालवीर
  बालाघाट
  बालासिनोर
  बाली
  बाल्कन
  बाल्टिमोर
  बाल्तिस्तान
  बावडेकर रामचंद्रपंत
  बावरिया किंवा बोरिया
  बावल निझामत
  बाशीरहाट
  बाष्कल
  बाष्पीभवन व वाय्वीभवन
  बांसगांव
  बांसडा संस्थान
  बांसदी
  बांसवाडा संस्थान
  बासी
  बांसी
  बासोडा
  बास्मत
  बाहवा
  बाहलीक
  बाळंतशेप
  बाळाजी आवजी चिटणवीस
  बाळाजी कुंजर
  बाळाजी बाजीराव पेशवे
  बाळाजी विश्वनाथ पेशवे
  बाळापुर
  बिआवर
  बिआस
  बिकानेर संस्थान
  बिकापूर
  बिक्केरल
  बिजना
  बिजनी जमीनदारी
  बिजनोर
  बिजली
  बिजा
  बिजापूर
  बिजावर संस्थान
  बिजोलिया
  बिज्जी
  बिझान्शिअम
  बिठूर
  बिथिनिया
  बिधून
  बिनामी व्यवहार
  बिनीवाले
  बिब्बा
  बिभीषण
  बिमलीपट्टम
  बियालिस्टोक
  बिलग्राम
  बिलदी
  बिलाइगड
  बिलारा
  बिलारी
  बिलासपूर
  बिलिन
  बिलिन किंवा बलक
  बिलोली
  बिल्हण
  बिल्हौर
  बिशमकटक
  बिश्नोई
  बिष्णुपूर
  बिसालपूर
  बिसोली
  बिस्मत
  बिसमार्क द्वीपसमूह
  बिस्मार्क, प्रिन्स व्हॉन
  बिस्बान
  बिहट
  बिहारीलाल चौबे
  बिहोर
  बीकन्स फील्ड
  बीजगणित
  बीजभूमिती
  बीट
  बीड
  बीरबल
  बीरभूम
  बुखारा
  बुखारेस्ट
  बुजनुर्द
  बुडापेस्ट
  बुंदी
  बुंदीन
  बुंदेलखंड एजन्सी
  बुद्ध
  बुद्धगथा
  बुद्धघोष
  बुद्धि
  बुद्धिप्रामाण्यवाद
  बुध
  बुन्सेन
  बुरुड
  बुलढाणा
  बुलंदशहर
  बुलबुल
  बुल्हर, जे. जी.
  बुशायर
  बुसी
  बुहदारण्यकोपनिषद
  बृहन्नटा
  बृहन्नारदीय पुराण
  बृहस्पति
  बृहस्पति स्मृति
  बेकन, फ्रॅन्सिस लॉर्ड
  बेगुन
  बेगुसराई
  बेचुआनालँड
  बेचुना
  बेझवाडा
  बेझोर
  बेंटिंक, लॉर्ड विल्यम
  बेट्टिहा
  बेडन
  बेडफर्ड
  बेथेल
  बेथ्लेहेम
  बेदर
  बेन, अलेक्झांडर
  बेने-इस्त्रायल
  बेन्थाम, जर्मी
  बेमेतारा
  बेरड
  बेरी
  बेरीदशाही
  बेल
  बेल, अलेक्झांडर ग्राहाम
  बेलग्रेड
  बेलदार
  बेलफास्ट
  बेलफोर्ट
  बेला
  बेलापूर
  बेला प्रतापगड
  बेलिझ
  बेलूर
  बेल्जम
  बेस्ता
  बेहडा
  बेहरोट
  बेहिस्तान
  बेळगांव
  बेळगामी
  बैकल
  बैगा
  बैजनाथ
  बैझीगर
  बैतूल
  बैरागी
  बैरुट
  बोकप्यीन
  बोकेशियो
  बोगले
  बोगार
  बोगोटा
  बोग्रा
  बोटाड
  बोडीनायक्कनूर
  बोडो
  बोघन
  बोधला माणकोजी
  बोनाई गड
  बोनाई संस्थान
  बोपदेव
  बोबीली जमीनदारी
  बोर
  बोरसद
  बोरसिप्पा
  बोरिया
  बोरिवली
  बोर्डो
  बोर्नमथ
  बोर्निओ
  बोलनघाट
  बोलपूर
  बोलिव्हिया
  बोलीन
  बोलुनद्रा
  बोल्शेविझम
  बोस्टन
  बोहरा
  बोळ
  बौद
  बौधायन
  बौरिंगपेठ
  ब्युनॉस आरीस
  ब्रॅडफोर्ड
  ब्रॅंडफोर्ड
  ब्रश
  ब्रह्म
  ब्रह्मगिरि
  ब्रह्मगुप्त
  ब्रह्मदेव
  ब्रह्मदेश
  ब्रह्मपुत्रा
  ब्रह्मपुरी
  ब्रह्मवैवर्त पुराण
  ब्रह्म-क्षत्री
  ब्रम्हांडपुराण
  ब्रह्मेंद्रस्वामी
  ब्राउनिंग रॉबर्ट
  ब्रॉकहौस, हरमन
  ब्राँझ
  ब्राझील
  ब्रायटन
  ब्राहुइ
  ब्राह्मण
  ब्राह्मणबारिया
  ब्राह्मणाबाद
  ब्राह्मणें
  ब्राह्मपुराण
  ब्राह्मसमाज
  ब्रिटन
  ब्रिटिश साम्राज्य
  ब्रिडिसी
  ब्रिस्टल
  ब्रुंडिसियम
  ब्रुनेई
  ब्रुन्सविक
  ब्रूसेल्स
  ब्रूस्टर, सर डेव्हिड
  ब्रेमेन
  ब्रेस्लॉ
  ब्लॅक, जोसेफ
  ब्लॅंक, मॉन्ट
  ब्लॅव्हॅट्रस्की, हेलेना पेट्रोव्हना
  ब्लोएमफाँटेन
 
  भक्कर
  भक्तिमार्ग
  भगंदर
  भंगी
  भगीरथ
  भज्जी
  भटकल
  भटिंडा
  भटोत्पल
  भट्टीप्रोलू
  भट्टोजी दीक्षित
  भडगांव
  भडभुंजा
  भंडारा
  भंडारी
  भंडीकुल
  भडोच
  भद्राचलस्
  भद्रेश्वर
  भमो
  भरत
  भरतकाम
  भरतपूर
  भरथना
  भरवाड
  भरहुत
  भरिया
  भर्तृहरि
  भवभूति
  भवया
  भवानी
  भविष्यपुराण
  भस्मासुर
  भागलपूर
  भागवतधर्म
  भागवतपुराण
  भागवत राजारामशास्त्री
  भागीरथी
  भाजीपाला
  भाजें
  भाट
  भाटिया
  भांडारकर, रामकृष्ण गोपाळ
  भात
  भांदक
  भादौरा
  भाद्र
  भानसाळी
  भानिल
  भानुदास
  भानुभट्ट
  भाबुआ
  भामटे
  भारतचंद्र
  भारवि
  भालदार
  भालेराई
  भावनगर
  भावलपूर
  भावसार
  भाविणी व देवळी
  भावे, विष्णु अमृत
  भाषाशास्त्र
  भास
  भास्करराज
  भास्कर राम कोल्हटकर
  भास्कराचार्य
  भिंगा
  भितरी
  भिंद
  भिंदर
  भिनमाल
  भिलवाडा
  भिलसा
  भिल्ल
  भिवंडी
  भिवानी
  भीम
  भीमक
  भीमथडी
  भीमदेव
  भीमदेव भोळा
  भीमसिंह
  भीमसेन दीक्षित
  भीमस्वामी
  भीमा
  भीमावरम्
  भीमाशंकर
  भीष्म
  भीष्माष्टमी
  भुइनमाळी
  भुइया
  भुईकोहोळा
  भुईमूग
  भुंज
  भुवनेश्वर
  भुसावळ
  भूगोल
  भूतान
  भूपालपट्टणम्
  भूपृष्ठवर्णन
  भूमिज
  भूमिती
  भूर्जपत्र
  भूलिया
  भूषणकवि
  भूस्तरशास्त्र
  भृगु
  भेडा
  भेडाघाट
  भेंडी
  भैंसरोगड
  भोई
  भोकरदन
  भोगवती
  भोग्नीपूर
  भोज
  भोजपूर
  भोनगांव
  भोनगीर
  भोंपळा
  भोपावर एन्जसी
  भोपाळ एजन्सी
  भोपाळ
  भोर संस्थान
  भोलथ
  भौम
 
  मकरंद
  मका
  मॅकीव्हेली, निकोलोडि बर्नाडों
  मक्का
  मक्रान
  मॅक्समुल्लर
  मॅक्सवेल, जेम्स क्लार्क
  मक्सुदनगड
  मंख
  मखतल
  मग
  मॅगडेबर्ग
  मगध
  मगरतलाव
  मंगरूळ
  मंगल
  मंगलदाइ
  मंगलोर संस्थान
  मंगलोर
  मगवे
  मंगळ
  मंगळवेढें
  मंगोल
  मंगोलिया
  मग्न
  मंचर
  मच्छली
  मच्छलीपट्टण
  मच्छी
  मंजटाबाद

  मंजिष्ट

  मंजुश्री
  मजूर
  मज्जातंतुदाह
  मज्जादौर्बल्य
  मंझनपूर
  मझारीशरीफ
  मटकी
  मट्टानचेरि
  मंडनमिश्र
  मंडय
  मंडला
  मंडलिक, विश्वनाथ नारायण
  मंडाले
  मंडावर
  मँडिसन
  मंडी
  मंडेश्वर
  मंडोर
  मढी
  मढीपुरा
  मणिपूर संस्थान
  मणिपुरी लोक
  मणिराम
  मणिसंप्रदाय
  मणिहार
  मतिआरी
  मंत्री
  मत्स्यपुराण
  मत्स्येंद्रनाथ
  मंथरा
  मथुरा
  मथुरानाथ
  मदकसीर
  मदनपल्ली
  मदनपाल
  मदनपूर
  मदपोल्लम्
  मदय
  मंदर
  मंदार
  मदारीपूर
  मदिना
  मदुकुलात्तूर
  मदुरा
  मदुरांतकम्
  मद्दगिरिदुर्ग
  मद्रदूर
  मद्रदेश
  मद्रास इलाखा
  मध
  मधान
  मधुकैटभ
  मधुच्छंदस्
  मधुपुर
  मधुमती
  मधुमेह
  मधुरा
  मधुवन
  मधुवनी
  मध्यअमेरिका
  मध्यदेश
  मध्यप्रांत व व-हाड
  मध्यहिंदुस्थान
  मध्व
  मन
  मनकी
  मनमाड
  मनरो, जेम्स
  मनवली
  मनसा
  मनु
  मनूची
  मनोदौर्बल्य
  मन्नारगुडी
  मम्मट
  मय लोक
  मयासुर
  मयूर
  मयूरभंज संस्थान
  मयूरसिंहासन
  मराठे
  मरु
  मरुत्
  मरुत्त
  मलकनगिरी
  मलकापुर
  मलबार
  मलबारी, बेहरामजी
  मलय
  मलयालम्
  मलाका
  मलायाद्विपकल्प
  मलाया संस्थाने
  मलायी लोक
  मलिक महमद ज्यायसी
  मलिकअंबर
  मलेरकोटला
  मल्हारराव गायकवाड
  मल्हारराव होळकर
  मसूर
  मसूरी
  मॅसेडोनिया
  मस्कत
  मस्तकविज्ञान
  मस्तिष्कावरणदाह
  महबूबनगर
  महंमद पैगंबर
  महंमदाबाद
  महमुदाबाद
  महमूद बेगडा
  महाकाव्य
  महारान, गोविंद विठ्ठल
  महाजन
  महाड
  महाडिक
  महादजी शिंदे
  महानदी
  महानुभावपंथ
  महाबन
  महाबळेश्वर
  महामारी
  महायान
  महार
  महाराजगंज
  महाराष्ट्र
  महाराष्ट्रीय
  महालिंगपूर
  महावंसो
  महावस्तु
  महावीर
  महासंघ
  महासमुंड
  महिदपूर
  महिंद्रगड
  महिषासुर
  मही
  महीकांठा
  महीपति
  महू
  महेंद्रगिरि
  महेश्वर
  माकड
  माकमइ संस्थान
  माग
  मांग
  माँगकंग संस्थान
  मागडी
  माँगनाँग संस्थान
  माँगने संस्थान
  मांगल संस्थान
  मांचूरिया
  मांजर
  माजुली
  मांझा प्रदेश
  माझिनी
  माँटगॉमेरी
  माँटेग्यू एडविन सॅम्युअल
  माँटेनीग्रो
  मांडक्योपनिषद
  माड्रीड
  माढें
  माणगांव
  मातृकन्यापरंपरा
  माथेरान
  मादण्णा उर्फ प्रदनपंत
  मादागास्कर
  मादिगा
  माद्री
  माधव नारायण (सवाई)
  माधवराव पेशवे (थोरले)
  माधवराव, सरटी
  माधवाचार्य
  मांधाता
  माध्यमिक
  माण
  मानभूम
  मानवशास्त्र
  मानससरोवर
  मानाग्वा
  मानाजी आंग्रे
  मानाजी फांकडे
  माने

  मॉन्स

  मामल्लपूर
  मॉम्सेन
  मायकेल, मधुसूदन दत्त
  मायफळ
  मायराणी

  मॉयसन, हेनरी

  मायसिनियन संस्कृति
  माया
  मायावरम् 
  मायूराज
  मारकी
  मारकीनाथ
  मारवाड
  मारवाडी
  मॉरिशस
  मार्कंडेयपुराण
  मार्क्स, हीनरिच कार्ल
  मार्मागोवें
  मार्संलिस
  मालवण
  मालिआ
  मालिहाबाद
  मालेगांव
  मालेरकोट्ला संस्थान
  मालोजी
  माल्टा
  माल्डा

  माल्थस, थॉमस रॉबर्ट

  मावळ
  माशी
  मासा
  मास्को
  माही
  माहीम
  माळवा
  माळशिरस
  माळी
  मिंटो लॉर्ड
  मित्र, राजेंद्रलाल डॉक्टर
  मिथिल अल्कहल
  मिथिला (विदेह)
  मिदनापूर
  मिनबु
  मियानवाली
  मिरची
  मिरजमळा संस्थान
  मिरज संस्थान
  मिराबाई
  मिराबो ऑनोरे गॅब्रिएल 
  मिराशी
  मिरासदार
  मिरीं
  मिर्झापूर
  मिल्टन, जॉन
  मिल्ल, जॉन स्टुअर्ट
  मिशन
  मिशमी लोक
  मिस्त्रिख
  मिहिरगुल
  मीकतिला
  मीकीर
  मीठ
  मीडिया
  मीना
  मीमांसा
  मीरगंज
  मीरजाफर
  मीरत
  मीरपूर बटोरो
  मीरपूर-माथेलो
  मीरपूर-साक्रो
  मुकडेन
  मुकुंद
  मुक्ताबाई
  मुक्तिफौज
  मुक्तेश्वर
  मुंगेली
  मुंजाल
  मुझफरगड
  मुझफरनगर
  मुझफरपूर
  मुंडा
  मुण्डकोपनिषद
  मुद्देबिहाळ
  मुद्रणकला
  मुधोळ संस्थान
  मुंबई
  मुबारकपूर
  मुरबाड
  मुरसान
  मुरळी
  मुरादाबाद
  मुरार- जगदेव
  मुरारराव घोरपडे
  मुरी
  मुर्शिद कुलीखान
  मुर्शिदाबाद
  मुलतान
  मुलाना
  मुसीरी
  मुसुलमान
  मुस्तफाबाद
  मुळा
  मूग
  मूतखडा
  मूत्रपिंडदाह
  मूत्राशय व प्रोस्टेटपिंड
  मूत्रावरोध
  मूत्राशयभंग
  मूर

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .