विभाग आठरावा : बडोदें ते मूर
ब्रह्मगिरी– म्हैसूरच्या चितळदुर्ग जिल्ह्यांतील मोलकाल्मुरं तालुक्यांत ही टेंकडी असून हिच्यावर एका मोठ्या शिळेवर कोरलेले अशोकाचें आज्ञापत्र इ. स .१८९२ त सापंडलें. या टेंकडीवरील किल्ला १२ व्या शतकापर्यंत निडुगळच्या चोल राजाकडे असून त्याच्यापासून तो होयसळ बल्लाळ राजानें घेतला.