विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोलीन- (टोलुईन)– बोलीन हा गंध वर्गांतील उत्कर्व आहे. यास मिथिल उदिन (मेथिल बेझिन) असेंहि दुसरें नांव आहे. ऊदीन श्रेणींतील हा पहिला श्रेणिका (होपोलोन) आहे. प्रथम याचा शोध पेलेटिए यास लागला. त्यानें 'मॅरिटिमा” च्या राळेपासून एक प्रकारचें तेल व वायु काढला व त्यांत '' बोलीन” या शोध लागला.
हा उत्कर्ष लांकडाच्या डांबरांत आणि पाषाणतेलांत असतो. दगडी कोळशापासून जें हलकें तेल (लाइट ऑईल) निघतें त्याचें आंशिक (फॅक्शनल) पातन करूंन बाजारी बोलीन तयार करतात. हा पदार्थ फ्रीडेल आणि क्राफ्ट यांच्या रीतीनें करतात. ही रीत १८७७ सालीं निघाली. यांत ऊदिन (बेंन्झिन) आणि मिथिल हरद (मेथिला क्लोराइड) यांच्या मिश्रणावर स्फटहरिद (अँल्युमिनम क्लोराइट) याची क्रिया करतात. बोलीन निर्वर्ण, चंचल, रसरूप असून तो ११०.३० वर उकळतो. त्याचें वि. गुरूत्व ०.८७०८ असतें. बोलीन पाण्यांत अविद्राव्य आहे. परंतु अल्कहल आणि इथ्र यांत तो सहज विद्रुत होतो. याचें उज्जिदोकरण केलें म्हणजे षट्उज्ज बोलीन तयार होतो. पातळ नत्राम्ल (नायट्रिक अँसिड) किंवा क्रुमाम्ल (क्रोमिक अँसिड) यानें प्राणिदीकरण केलें म्हणजे ऊदाम्ल तयार होतें, आणि कुमिल हरिद (क्रोमिल क्लोराइड) आणि पाणी यांची क्रिया केली असतां ऊदिल प्रायोज्जिद (बेंझाल्डिहाइड) तयार होतो. याचें नत्रीकरण (नायट्रेशन) केलें म्हणजे आसन्न आणि पर (आर्थो किंवा पॅरा) नत्रिल बोलीन तयार होतात. या नत्रिल बोलिनाचें उज्जिदीकरण केलें म्हणजे अत्युपयुक्त बोलिदाइन (टोलु इडाइन) क६ उ४ (कउ३) (नउ२) पदार्थ तयार होतो.
ऊदिना (बेंझिन) पासून बोलीन तयार करण्याकरितां प्रथम स्तंभाची क्रिया ऊदिनावर करूंन स्तंभऊदिन तयार करतात आणि यावर मिथिल अदिद (मेथिल आयोडाइड) आणि सिधूंची क्रिया इथ्रच्या सान्निध्यांत करतात म्हणजे बोलीन तयार होतो.
बोलीनचा मुख्य उपयोग नीलीन (अनिलीन) चे रंग तयार करण्याकडे व कडु बदामाचें तेल तयार करण्याकडे करतात. बोलीन यास भानिलमथिन (फेनिल मिथेन) असेंहि दुसरें नांव आहे.