विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोलिव्हिया– दक्षिण अमेरिकेंतील एक प्रजासत्ताक राज्य याचा विस्तार दक्षिण अक्षांश ९० ४४’ ते २२० ५०’ व पश्चिम रेखांश ५८० ते ७०० इतका आहे. याच्या उत्तरेस व पूर्वेस ब्राझिल; दक्षिणेस पाराग्वे व अर्जेंटिना; पश्चिमेस चिली व पेरू आहेत. क्षेत्रफळ (१९२४) अंदाजें ५१४१५५ चौरस मैल आहे. बोलिव्हियाचा ३/५ भाग डोंगराळ प्रदेश असून निम्न मळईचीं मैदानें, दलदली व साधारणपणें चढत जाणारे जंगलमय प्रदेश यांचा बनलेला देश आहे. या देशाचे अँमॅझॉन व ला प्लाटा व या नद्यांच्या शाखा असें भाग केलेंले आहेत.
या देशांत रोगाग्वा रोग्वाग्वाडो, कन्सेप्शन, बॅहियानेंग्रा वगैरे सरोवरें आहेत. या देशाला समुद्रकिनारा व बंदरें नाहींत, हा देश सर्वस्वीं उष्णकटिबंधांत आहे. या देशांत सर्व प्रकारचें हवामान आढळतें. यूरोपांतून येथें घोडे गुरें, शेळ्या, बकरीं, डुकरें व कोंबड्या आणून वाढविल्या आहेत. रेशमाचे किडेहि वाढविले आहेत. येथें रबर होतो. उष्णप्रदेशांत ऊस, तांदूळ व तंबाखू पिकवितात.
व स्ती व द ळ ण व ळ ण- येथें इंडियन कॉकेशियन व मेस्टिझो नांवाचे मिश्र लोक व कांहीं थोडेंसें नीग्रो लोकांचे वंशजयांची वस्ती आहे. १९२४ त येथील लो. स. २९९०२२० होती. हुआनचाका, उयुनी, टुपिझा, व्हियाचा, टॅराटा, टोटोरा, असेंन्शन हीं लहान शहरें आहेत. रेल्वेची लांबी १४०१ मैल असून अँटॉ फोंगेस्टो बोलिव्हियन अँटोपेगेस्टो -लाफेज व ऑरिकालापेस या तीन रेल्वे लाईनीं मुख्य आहेत.
धंदे– गुरें वाढविणें, खाणी खणणें हे जुने धंदे आहेत. कातडीं बाहेर देशीं पाठवितात. उष्ण प्रदेशांत बकरीं वाढवितात. व समशीतोष्ण प्रदेशांत लोंकरीकरितां मेंढ्या पाळतात. लामा, अल्पाका व लोंकर असलेले चिंचिला वगैरे जनावरें वाढवितात. अँडीजच्या उष्ण व समशीतोष्ण खो-यांत धान्यें, फळें व भाज्या पिकवितात. उंसापासून रम करतात . उष्णप्रदेशांत तांदूळ व तंबाखू उत्पन्न करतात. बेनी प्रांतांत काका व अँडीजच्या उष्ण प्रदेशांत कॉफी पिकवितात. रबर गोळा करणें व सिंकोना वाढविणें हेहि धंदे आहेत. देशी लोक लामाच्या लोकरीचें कापड व कापसाचें व लोकरींचें कापड जुन्या पद्धतीनें बनिवतात. चामडें कमावणें व खोगीर बनविणें हेहि धंदे चालतात. विड्या, साबण, मेणबत्त्या , टोप्या, हातमोजे, स्टार्च, चीज, व मातीचीं भांडीं, साखर, दारू व रेशीम देशी लोक बनविात. परकी व्यापार महत्त्वाचा आहे. कापसाचें कापड, लोंकरीचें कापड, जनावरें अन्नसामुग्री, लोंखडी सामान, यंत्रें दारू, स्पिरिट व कपडे बाहेर देशाहून येथें येतात. व खनिज पदार्थ, जंगलांतील व शेतांतील कांहीं पदार्थ बाहेर देशीं रवाना होतात. १९२३ सालीं बोलिव्हियांतील आयात व निर्गत अनुक्रमें ४४४७१६० व ८६१५५०८ पौंडाच्या मालाची होती.
रा ज्य व्य व स्था.- येथील राज्यकारभार युनिटेरियन पद्धतीच्या प्रजासत्ताक राज्याच्या धर्तीवर आहे. कार्यकारी सत्ता एक प्रेसिडेंट व दोन व्हाईस प्रेसिडेट यांच्या हातीं आहे. यांची निवडणूक सार्वजनिक मतांनीं चार वर्षांकरितां होतें. प्रेसिडेंटच्या मदतीस पांच मंत्र्यांचें मंडळ असतें. कायदे करण्याची सत्ता सीनेट व डेप्युटी लोकांचीं चेंबरें यांच्या हातीं आहे. येथें एक राष्ट्रीय कोर्ट, आठ वरिष्ट जिल्हाकोर्टें व हलकीं जिल्हा कोर्टें आहेत. प्रत्येक प्रांतावर एक प्रिफेक्ट असतो. सन १९१५ सालच्या कायद्याअन्यें ३५७७ लोकांचें लष्कर ठेवण्याचें ठरलें आहे. पन्नास वर्षाच्या दरम्यान प्रत्येक पुरूषास लष्करी नोकरी करावी लागते. लापेझ येथें लष्करी शाळा व तोफखाना आहे.
शि क्ष ण ध र्म.- येथें मोफत व सक्तीचें शिक्षण असूनहि शिक्षणाची प्रगति चांगलीं नाहीं. १९१८ सालीं बोलिव्हियांत ४५० प्राथमिक शाळा, माध्यमिक शिक्षणासाठीं एकंदर ३१ शाळा व उच्च शिक्षणासाठीं १९ कॉलेजें होतीं. सुक्रे येथें सेंट फ्रँकोझेबिया युनिर्व्हीसटी व ला प्रे येथें एक युनिव्हर्सिटी आहे. उमाला येथें शेतकी शाळा आहे. शिक्षणाची प्रगति चांगलीं नाहीं. ओरूरा येथें खाणीची व इंजिनिअरिंगचा शाळा सुक्रे व ट्रिनिदाद येथें व्यापारी शाळा व मिशनरी शाळा आहेत. सरकारी रीतीनें रोमन कॅथोलिक धर्म चालतो. पण प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य देण्यांत आलें आहे. १९२५ सालीं सर्व उत्पन्नाच्या बाबी मिळून उत्पन्न ३९०३२५७ बोलिव्हियानो व ४३८७३७४२ बोलिव्हियानो खर्च होता.
इ ति हा स.- या देशाला सायमन बोलिव्हार याच्या नांवावरून संध्यांचें नांव प्राप्त झालें आहे. हा पूर्वींच्या पेरूच्या इंका राज्याचा भाग होता. जेव्हां ब्यूनॉस आरीसच्या देशभक्तांनीं रिओडि ला प्लाटाचे भाग स्वतंत्र केलें, तेव्हां त्यांनीं आपलें लक्ष वरच्या पेरूकडे लावलें १८०९ सालापासून १८२५ सालपर्यंत सारखी लढाई चालू होती. शेवटी १८२५ सालीं वरच्या पेरूचें स्वंतत्र राष्ट्र बनवून त्याला बोलिव्हिया हें नांव देण्यांत आलें. १८२६ सालीं चुक्विसाका येथें नवीन कांग्रेस भरविण्यांत आली व नवीन प्रजासत्ताका राज्याकरितां बोलिव्हारनें केलेंले कायदे विचार करूंन कायम करण्यांत आले. पहिल्या प्रेसिडेंटा (सँटाक्रूझ) च्या कारकीर्दींत पेरूशीं व्यापारी तह करण्यांत आला. १८३५ सालीं पेरूमध्यें मुख्य सत्तेबद्दलच्या भांडणामुळें दोन पक्ष झालें. सँटा क्रूझनें या देशावर चाल करूंन जनरल गॅमरा याचा पराभव केला. व १८३६ सालीं तो पेरूचा प्रोटेक्टर बनला. चिलीनें गॅमेराचा पक्ष धरून तीन वर्षें लढाई केली. व क्रूझचा पराभव केला. गॅमेरा पेरूचा व व्हेलास्को बोलिव्हियाचा मुख्य बनला. क्रूझच्या पक्षानें बंड करूंन मुख्य सत्ता जनरल बॅलिव्हियनला दिली. या बंडाळीच फायदा घेऊन गॅमेरानें लापेझचा प्रांत खालसा करण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅलिव्हियननें त्याचा एका लढाईंत पराभव केला व गॅमेरा मारला गेला .बॅलिव्हियनची सत्ता १८४८ सालापर्यंत टिकली. त्याच्या मागून जनरल बेल्झू बंड करूंन प्रेसिडेंट झाला. याच्या मागून जनरल कोर्डोव्हा हा प्रेसिडेंट झाला. परंतु लवकरच लष्करी बंड झालें, व लिनॅरेस प्रेसिडेंट झाला. १८६१ सालीं बंडाळी होऊन याला पदच्युत करण्यांत आलें व डॉ. आचा हा प्रेसिडेंट झाला. १८६२ सालीं संयुक्त संस्थानांशीं शांततेचा व व्यापारी तह करण्यांत आला. पुढल्या वर्षीं बेल्जमशीं असाच तह करण्यांत आला. १८६५ सालीं मेलगॅरेजोंचें लष्करी बंड झालें व यानें देशांतील सत्ता बळकावली.
१८७१ सालीं प्रेसिडेंट मेलगॅरेजोला हांकून लावण्यांत आलें. मोरॅलेस हा प्रेसिडेंट झाला. पण तो १८७१ सालीं मारला गेला. याच्या मागून बॅलिव्हियन प्रेसिडेंट झाला. याच्या कारकीर्दींत बोलिव्हियाचा पेरूशीं गुप्त तह झाला. १८६६ सालच्या तहान्वयें २४ वी पॅरेलल चिलीच्या राज्याची सरहद्द ठरविण्यांत येऊन, चिलीला जकातीचें अर्धें उत्पन्न व २३ व २४ व्या पॅरेललच्या मधील समुद्रकिना-यावर चिलीला व्यापाराची पूर्ण परवानगी देण्यांत आली होती. शिवाय कांहीं एक कर न देतां चिलीनें या देशांतील खनिज पदार्थ खणून बाहेर देशीं पाठवावे असें ठरलें होतें. १८७० सालीं एका आंग्लो चिली कंपनीला १०००० डॉलर भांडवलाच्या मोबदला बोलिव्हियानें २४ व्या पॅरलेलच्या उत्तरेचे नायट्रेट (सोरा) चे थर खणण्याची परवानगी दिली होती. बॅलिव्हियनच्या मृत्युनंतर डॉ. फ्रियास प्रेसिडेंट झाला. यानें दुसराच तह केला पंरतु हा तह कधींच कबूल करण्यांत आला नाहीं. १८७६ सालीं जनरल डेझा प्रेसिडेंट झाला. यानें बोलिव्हियांतून बाहेर पाठविलेल्या नायट्रटेच्या प्रत्येक क्विंटलवर १० सेंटचा कर मागितला व नाहीं पेक्षां नायट्रेट जप्त करण्यांत येईल असें जाहीर केलें. चिलीनें आरमार पाठवून बोलिव्हियाचीं बदंरें बंद केलीं. १८७९ सालीं चिलीच्या कर्नल सोटोमेयरनें अँटोफॅगास्टा घेतलें. बोलिव्हियानें लढाई जाहीर केली. पेरूनें मध्यस्थी करण्याचा यत्न केला पण तो चिलीला पसंत पडला नाहीं. व त्यानें पेरूशीं लढाई जाहीर केली.
पेरू व बोलिव्हिया या दोन्ही देशांत राज्यक्रांति झालीं. बोलिव्हियानें या लढाईंत विशेष लक्ष घातलें नाहीं. १८८३ सालीं चिली व बोलिव्हिया यांच्यामध्यें तह होऊन बोलिव्यिाचा सर्व समुद्रकिनारा व कोबिजा बदंर चिलीला मिळालें. १८९५ सालीं व बोलिव्हिया यांच्यामध्यें स्नेह वाढविण्याचा तह झाला. जर पेरूपासून टॅक्ना व अँरिका मिळालें तर चिलानें ते प्रांत बोलिव्हियाला द्यावे व बोलिव्हियानें ५०००००० डॉलर द्यावे व न मिळाले तर चिलीनें व्हिटर किंवा दुसरें तसेंच एकादें बंदर देण्याचें कबूल केलें. १८९५ सालीं शांतता व व्यापार यासंबंधीं चिलीशीं तह झाला. परंतु बंदर देण्याचें वचन पुरें करण्यांत आलें नाहीं. या काळांत डॉ. पॅचेको, कॅम्पेरो, डॉ. आर्से, डॉ. मॅरिआनो बॅप्टिस्टा हे प्रेसिडेंट झालें. १८९६ सालीं डॉ. आलोन्सो प्रेसिडेंट झाला.
सुक्रे ही प्रजासत्ताकाची राजधानी बनविण्याचा कायदा पास झाला. ला पेझनें बंड केलें. यांत बंडखोरांनां जय येऊन कर्नल पँडोचा विजय झाला व तो प्रेसिडेंट झाला. ए कोटी नगद भरपाई घेऊन अँन्के प्रांताचा कांहीं भाग ब्राझिलला दिला. व सरहद्दीचें भांडण १९०३ सालीं मिटविण्यांत आलें.
१९०४ सालीं इस्मायल माँटेस प्रेसिडेंट झाला. याला असें आढळून आलें कीं बोलिव्हियाची लढण्याची ताकद नसल्यामुळें चिलीशीं होऊं घातलेल्या भांडणांत हार खाणें बरें. १९०५ सालीं तह होऊन चिलीला टॅक्ना व अँरिका प्रांत देण्यांत आले व बंदर मिळविण्याचा हट्ट बोलिव्हियानें सोडला. याबद्दल चिलीनें स्वतःच्या खर्चानें अँरिकापासून ला पेझपर्यंत आगगाडी करण्याचें कबूल केलें व चिली प्रदेशांतून समुद्रकिना-यावरील कांहीं शहरांनां बोलिव्हियाला मोफत रहद्दारी करूं देण्याचें मान्य केलें. चिलीनें बोलिव्हियाला कांहीं भरपाई देण्याची व देशांतील कांहीं रेल्वे बांधण्याच्या कामीं कांहीं पैशाची मदत करण्याचें कबूल केलें.
१९०६ पासून १९१३ पर्यंत, १९१३ ते १९१७ पर्यंत व १९१७ ते १९२१ पर्यंत अनुक्रमें एलिडोरो व्हिलाझो, माँटेस व बॉप्टिस्टा साव्हेड्रा हे अध्यक्ष होतें. बोलिव्हिया व पेरूमधील सरहद्द ठरविण्याकरतां नेमलेल्या कमीशननें आपलें काम १९१५ सालीं पुरें केलें. १९१३ सालीं बोलिव्हिया व पॅराग्वेमध्यें तह होऊन सरहद्दीचा लढा आपापसांत मिटवावा असें ठरलें. महायुद्धांत बोलिव्हिया हें तटस्थ होतें, तथापि त्याची सहानुभूति दोस्त राष्ट्रांकडे होती. व्हॅर्सेलिस येथील शांततापरिषदेस बोलिव्हियाचा प्रतिनिधि हजर होता. बोलिव्हिया हें राष्ट्रसंघाचा सभासद आहे. पॅसिफिकला जोडण्यांत आलेल्या कालव्यासंबंधानें बोलिव्हिया व चिली यांच्या दरम्यान जोराचा वाद चालु आहे. (वाले बोलिव्हिया, इट्स पीपल अँड रीसोर्सेस १९१४).