विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोरसद– मुंबई इलाख्यांत खेडा जिल्ह्याच्या बोरसद तालुक्याचें दुहेरी तटंबदीचें गांव. याचा बाहेरील तट पडला असून आंतील चांगल्या स्थितींत आहे. मराठेशाहीच्या वेळच्या बांधणीचे हे तट असून येथें १७४८ पर्यंत मोठमोठ्या लढाया झाल्या. इ. स. १४९७ सालीं बांधलेली जुनी ७ मजली, १३ कमानींची येथील विहिर प्रसिद्ध आहे.