विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोर– बोरीचीं झाडें फार प्राचीन काळापासून आर्य लोकांस माहीत आहेत. बदरीनाथ येथील बदरिकाश्रमांतील ॠषी बोरें खाऊन रहात असत असा उल्लेख पुराणांत सापडतो. बोरीचीं झाडें अफगाणिस्तान, वायव्यप्रांत, हिमाल यापासून तों तहत सीलोनपर्यंत सर्व हिंदुस्थान देश, ब्रह्मदेश यांमध्ये सापडतात. बोरीची झाडें अफगाणिस्तान, वायव्यप्रांत ,हिमालयापासून तों तहत सीलोनपर्यंत सर्व हिदुस्थान देश, ब्रह्मदेश यामध्यें सांपडतात. मलाक्का, सयाम, चीन, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांत बोरीची थोडिबहुत लागवड आहेच. राहुरी येथील बोरी पेशवाईंत फार प्रसिद्ध होत्या सिंध, बडोदें,, खानदेश या प्रांतांत बोरीची लागवड बरीच सुधारलेली आहे.
उत्तर हिदुस्तान, मुंबई, मद्रास व ब्रह्मदेश येथें बोरीच्या झाडाच्या सालींचा कातडी कमावण्याकडे उपयोग करतात. छोटानागपूर प्रांतांत साल व फळ यांचा वरील कामाकरितां उपयोग करतात. हरितरंजकद्रव्य तळाशीं बसावें म्हणून कधीं कधीं या झाडाची साल निळीच्या पिपांत टाकतात. याच सालींत टॅनिन अम्ल असतें. देशी वैद्यकांत बोरीच्या झाडाचे बहुतेक भाग उपयोगी पडतात.