विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोपदेव- हा विद्वान, कवि, वैद्य व वैय्याकरणग्रंथकार तेराव्या शतकांत होऊन गेला. हा देवगिरीच्या यादव राजाच्या पदरीं होता व यादवांचा प्रसिद्ध विद्वान मंत्री हेमाद्री पंत उर्फ हेमाडपंत याचा त्यास आश्रय होता. मुक्ताफळ व हरिलीला हे ग्रंथ त्यानें रचिले आहेत. हरिलीलेंत सर्व भागवत संक्षेपानें आणलें आहे. त्यानें मुग्धबोध नांवाचें सुस्कृत व्याकरण रचिलें आहे. महाराष्ट्रांत बोपदेव दोन झालें.