विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोडीनायुक्कनूर– मद्रास. जिल्ह्यांत पेरियानकुलुस तालुक्यांत हे गांव आहे. या नांवाची एक जमीनदारी असून तिचें हें गांव मुख्य आहे. चहा, कॉफी व वेलदोडा यांच्या व्यापारामुळें हें गांव सारखें वाढत आहे. पाळेगार लोकांच्या जुन्या जमीनदारींपैकीं ही एक आहे. येथील जमीनदार १३३६ सालीं गुत्तीहून येथें आले. ही जमीनदारी हैदरअल्ली व त्रावणकोरच्या राजाकडे मध्यंतरी होती. ती १८९३ सालीं पुन्हां जमीनदारानें परत मिळवली.