विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बोग्रा जि ल्हा.– बंगाल. क्षेत्रफळ १३६९ चौरस मैल. बोग्रा हा लहान जिल्हा आहे. तागाचें पीक चांगलें होत असल्यामुळें व जलमार्ग व खुष्कीच्या मार्गानें दळणवळणाची सोय असल्यामुळें या जिल्ह्याची भरभराट होत आहे. या जिल्ह्यांत दलदलीची जमीन बरीच आहे परंतु कांहीं गाळाची जमीन सुपीक आहे. उन्हाळ्यांत उष्णता ९६० व हिवाळ्यांत ५७० असतें. पावसाळ्यात (६५ इंच ) आरंभ उन्हाळ्यांत होतो. ह्या भागांत वादळें व भूकंप हीं केव्हां केव्हां होतात.
इतिहास- येथें कामरूप व पौंड्रवर्धन हीं राज्यें प्राचीन काळीं होतीं. महास्थान ही पौंड्र लोकांची राजधानी होती. नवव्या शतकांत पाल व ११ व्या शतकांत सेन राजे येथें राज्य करीत होतें. मुसुलमानापासून १७६५ सालीं हा मुलूख इंग्रजांकडे आला. १८५९ सालीं हा स्वंतत्र जिल्हा करण्यांत आला. महास्थान, शेरपूर , खेतल व भवानीपूर येथें प्राचीन अवशेष सापंडतात. जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) १०४८६०६ यांत खेडीं ३८६५ असून लोकसंख्या सारखी वाढत आहे. संयुक्तप्रांत व छोटानागपूर या प्रांतांतून फार लोक इकडे आले आहेत. मुसुलमान शें. ८२ व हिंदु शें. १८ आहेत. येथील कोरव लोक मुसुलमान झाल्यामुळें त्यांची संख्या जास्त आहे.
भात, ताग, ऊंस, तंबाखू व गळिताचीं धान्यें हीं मुख्य पिकें आहेत. पूर्वीं येथें रेशमाचा व्यापार होता पण अलीकडे तो नाहींसा झाला आहे; त्यास पुन्हां ऊर्जितावस्थेंत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत आयात माल विलायती कापड, पोती, मीठ राकेल, तंबाखू इस्टर्न बंगाल रेल्वे व ब्रह्ममुत्रा सुलतानपूर रेल्वे हे आगगाडीचे रस्ते या जिल्ह्यांत आहे. ब्रह्मपुत्रा व बंगाली यांच्या प्रवाहांतून बोटी, नेहमीं चालू असतांत. साक्षरतेंचें प्रमाण शेंकडा ५ आहे. मुख्य गांव बोग्रा अथवा बगुरा हें होय. याची लोकसंख्या सुमारें ९ हजार. येथें १८७६ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झालीं. हें गांव बुह्मपुत्रा सुलतानपूर रेल्वेवर स्टेशन आहे.