विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेहरोट– राजपुताना, अलवार संस्थानांतील बेहरोट नांवाच्या तहशिलीचें मुख्य ठिकाण अलवार शहाराच्या वायव्येस ३२ मैलांवर असून राजपुताना माळवा रेल्वेच्या अजेरक स्टेशनच्या नैर्ॠत्सेस १८ मैल आहे एकदंर लोकसंख्या सन १९११ सालीं ६२५३ होती; त्यांपैकीं शेकडा ३५ अहीर आहेत.