विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेलूर- म्हैसूर, हसन जिह्यांतील वायव्येकडील तालुका .याचें क्षेत्रफळ ३३९ मैल असून लोकसंख्या (१९११) ७३६३८. तालुक्यांत बेलूर हें एक शहर (लोकसंख्या १६३१) असून ३५३ खेडीं आहेत. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशांतील जंगलांत कॉफीची लागवड करतात. नदीकांठीं तांदूळ पिकतो. पूर्वेकडील तंबाखू चांगलीं होतें.