विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेला प्रतापगड- संयुक्त प्रांतांत, प्रतापगड जिल्हा व तहशिलीचें मुख्य ठिकाण. हें औधरोहिलंखड रेल्वेच्या अलहाबादापासून ते फैजाबाद फांट्यावर आहे. लोकसंख्या सुमारें आठ हजार. नदीजवळील बेलाभवानीच्या देवळावरून त्याचें नांव पडलें आहे.