विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेलदार– एक मजूर जात. यांची लोकसंख्या सुमारें दोन लाख असून बिहार ओरिसा, संयुक्तप्रांत, मध्य हिंदुस्थान, व-हाड मध्यप्रांत यांतून व मुंबई इलाख्यांत (बारा हजारापर्यंत) आढळतात. माती खणणें, दगड फोडणें, गवंडी काम वगैरे बांधकामाकरितां लागणारीं कामें हे लोक करितात. हे वड्डराप्रमाणेंच आहेत किंवा वड्डरांनां बेलदार असेंहि म्हणतात. 'वड्डर पहा'.