विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बेल- बेलाचीं झाडें हिदुस्थानातं सर्वत्र आहेत. याला त्रिदळ पानें येतात. हिंदु लोक हें झाड पवित्र मानतात. कारण शिवाय देवतेला बिल्वदल फार प्रिय आहे अशी त्यांची समजूत आहे. यांचें रानटी झाड व लागवडीचें झाड असें दोन भेद आहेत. ह्या झाडाचें फळ, पानें, साल व मुळ्या औषधी उपयोगांत आणतात.