विभाग आठरावा : बडोदें ते मूर 

बेरीदशाही ( बेदरची, स. १४९२-१६५६), का सी म बे री द ( १४९२-१५०४).- बहामनी राज्याची राजधानी अहमदाबाद बेदर येथें कासीम बेरीद नांवाच्या पुरूषानें हें स्वतंत्र राज्य स्थापन केलें. कासीम हा प्रथम महंमदशहा बहामनीपाशीं गुलाम होता. त्या सुलतानाच्या कारकीर्दींत पुष्कळ बंडें झालीं परंतु ती कासीम यानें मोडलीं. तेव्हा शहानें त्यास मुंख्य प्रधान केलें. तो स. १४९२ ते बेदर येथें स्वतंत्र झाला, आणि बारा वर्षें कारभार करूंन सन १५०४ ते मरण पावला. हा जातीचा तुर्की किंवा जॉर्जियन गुलाम होता.

अमीरबेरीद ( १५०४-१५४९).- हा कासीमचा मुलगा आसपासच्या राजांशीं लढून स्वतःचें संरक्षण करण्यांत ह्याचे पुष्कळ दिवस गेलें. शन १५२९ ते विजपूरच्या आदिलशहानें बेदरवर हल्लाकरूंन, अमीरचें बहुतेक राज्य हिरावुन घेतलें. बेदर व त्याच्या सभोंवारचा पाच लाखांचा मुलुख मात्र त्याजकडे राहिला. अमीर यानें बहामनी ४ राजे लागोपाठ गादीवर बसविले. शेंवटचा शह अहमदनगरास पळून गेल्यानें यानें स्वत:च सर्व राज्य ताब्यांत घेतले होतें.( १५२७) त्यानंतर तो १२ वर्षांनीं मरण पावला.(१५४९)

अलीबेरीद ( १५४९-१५६२).- अलीनेंच प्रथम शहा हा किताब धारण केला. पण अहमदनगरच्या निजामशहानें त्याच्या राज्याचा बराच भाग हल्ला करूंन घेतला. हा अमीराचा पुत्र होता. हा सन. १५६२ ते मरण पावला. नंतर त्याचा पुत्र इब्राहीम बेरीदशहा (१५६९ पर्यत) व इब्राहीमचा धाकटा भाऊ कासीम बेरीदशहा (१५७२) ह्यांनीं बेदरास राज्य केलें. त्यांच्या मागें मिर्झा अल्लीशहा यानें स. १६०९ पर्यंत व अमीर बेरीदशहा यानें (१६५६ पर्यंत?) राज्य केलें. यापुढें हळु हळु बेदरचें राज्य कमी होत चाललें होतें. पुढें १६५६ सालीं औंरगझेंब व त्याचा सरदार मीरजुम्ला ह्यांनीं विजापुरावर स्वारी केली. त्यावेळेस त्यांनीं बेरीदशाहीच्या तख्तावर असलेल्या पुरूषापासून बेदर शहर व किल्ला घेतला, आणि त्याच वेळीं ( सन १४७८ त) महंमद गावानें स्थापिलेली बेदरची पाठशाळा दारू भरून उडवून दिली. येणेंप्रमाणें बेदरशाहीचा अंत झाला. या घराण्याचें राज्य फारच थोड्या प्रांतावर होतें ( .बर्जेस-थर्ड आर्किऑलॉजिकल रिपोर्ट, १८७८ डिनॅस्टिज ऑफ दि साऊथ इंडिया; ग्रँट डफ)