विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बृहन्नारदीय पुराण- याला नारद किंवा नारदीय पुराण असेंहि म्हणतात. प्राचीन ॠषी नारद याच्या नांवानें विष्णुभक्ति पंथ सांगणारें हे विशिष्टपंथीय पुराण आहे. जगदुत्पत्ति वगैरे ठराविक पुराण विषयांचा मुळींच निर्देश यांत नसून फक्त विष्णुक्तीच्या कथा, स्त्रोत्रे व विधी मात्र दिले आहेत. श्राद्धे व प्रायश्चित्तें यांबद्दलही मोठा भाग आहे, परंतु या पुराणांतील विषयाची निदर्शक अशी एका राजाची गोष्ट दिली आहे. तींत त्या राजानें आपल्या मुलीस तिची इच्छा तृप्त करण्याचें वचन दिल्यावरून त्या मुलीनें बापास एक विष्णूचें उपोषणव्रत मोडण्यास नाहीं तर आपल्या मुलास बळी देण्यास सांगितलें तेव्हां राजानें प्रत्य्क्ष मुलाचा बळी दिला पण व्रत मोडले नाहीं, त्यांतच कमी पाप त्यस वाटलें असें दिलें आहें. याशिवाय नारद-उपपुराण म्हणूनही एक आहे.