विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बुलबुल- हा पक्षी पौरस्त्य देशांत आढळतो. याच्या अनेक जाती आहेत. उदा.-काळा, बंगाली, मद्रासी, मलबारी इत्यादि. घाटावरील काळा बुलबुल पक्षी असतो त्याची चोंच लाल, डोळ्यांतील बुबुळ गर्द पिंगट व पाय गर्द लाल (प्रवाळाप्रमाणें) रंगाचे अडतात. शरीराचा वरचा भाग फिकट रंगाचा असतो. पंख व शेपटी पिंगट असून डोक्यावर लहानसा तुरा असतो. दक्षिण हिंदुस्थानांतील डोंगराळ भागांत हा पक्षी मधून मधून दृष्टीस पडतो. विशेषतः सह्याद्रि पर्वतांत, महाबळेश्वरानजीकच्या टापूंत याचें वास्तव्य असतें.