विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिस्वान - संयुक्तप्रांतांत, सितापूर जिल्ह्यांतील आग्नेयीकडील तहशील. हींत बिस्वान, तंबौर व कोंद्री हे परगणे येतात. क्षेत्रफळ ५६५ चौरस मैल. लोकसंख्या (१९११)२८७९५४. खेडी ५०३ व मुख्य गांव बिस्वान. लोकसंख्या ८१०१. हें ''बिस्वनाथ '' नांवाच्या फकिरानें वसविलें असें म्हणतात. सय्यदसालरच्या अनुयायांची थडगी येथें दृष्टीस पडतात. हीं फार प्राचीन काळचीं आहेत. येथील तंबाखू, चिटाचें कापड व मातीचीं भांडी हीं फार प्रसिध्द आहेत.