विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिसालपुर - संयुक्तप्रांत. पिलभित जिल्ह्यांतील एक तहशील. क्षेत्रफळ ३६४ चौरस मेल. लोकसंख्या (१९११) १९८८८८. खेडी ४२७. मुख्य ठिकाण बिलासपूर. याची लोकसंख्या सुमारें १००८६. हें गांव बिसू अहिरानें शहाजहानच्या कारकीर्दीत वसविलें. येथें साखर व धान्य यांचा व्यापार चालतो.