विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिल्हौर - संयुक्तप्रांत कानपूर जिल्ह्यांतील एक उत्तरेकडील तहशील. क्षेत्रफळ ३३६ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) १३९५८१ असून यांत २४२ खेडीं व बिल्हौर हें एक गांव आहे. यांतून इसन, पांडू या नद्या वहात गेल्या आहेत. गंगा ही ईशान्य सीमेवर आहे. बिल्हौर (गांव) ची लोकसंख्या सुमारें पांच हजार असून हें कानपूर-अछनेरा या रेल्वेच्या फांटयावर आहे.