विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिलिन - खालच्या ब्रह्मदेशांत थटौन जिल्ह्यांतील एक तालुका. हा मार्ताबानच्या आखाताच्या पूर्वेस आहे क्षेत्रफळ ७३८ चौरस मैल. येथील जमीन नदींतून वाहात आलेल्या गाळाची बनलेली आहे. यांत ५५ खेडी आहेत. लोकसंख्या ६०००. मुख्य गांव बिलिन असून येथें उसाचें पिक चांगलें होतें.