विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिलारी - संयुक्तप्रांत. मुरादाबाद जिल्ह्यांतील आग्नेयीकडील ही तहशील आहे. क्षेत्रफळ ३३४ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) २२२१२४. खेडीं ३९१. मुख्य गांवे चंदोसी व बिलारी हीं आहेत येथील जमीन चांगली सुपीक आहे. येथें दाट झाडी आहे. उंसाचें पीक फायदेशीर आहे.