विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिलग्राम - संयुक्तप्रांत. हरदोई जिल्ह्यांतील ही एक नैर्ॠत्येकडे तहशील आहे. क्षेत्रफळ ५९७ चौरस मेल. लोकसंख्या १९०१ सालीं २९३२५४ होती. यांत खेडी ४८० व बिलग्राम, सांदी, गलावात व मधोगंज, चार गांवें आहेत. नैर्ॠत्येस गंगा आहे. तिला रामगंगा व ग-हा या नद्या मिळतात. मुख्य गांव बिलग्राम. लोकसंख्या (१९११) ७६०९. हें गांव पूर्वी ठठेरा, राइकवार व मुसुलमान यांच्या ताब्यांत अनुक्रमें होतें. बिल राक्षसावरून हें नांव पडलें असें म्हणतात. येथें मातीची व पितळेची भांडी, जोडे, नक्षीकाम केलेले दरवाजे व कापड यांचा व्यापार चालतो.