विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिजोलिया - राजपुतान्यांत उदेपूर संस्थानांतील जमीनदारी. मुख्य गांव बिजोलिया. हींत ४३ खेडीं आहेत. उत्पन्न ५७६००. येथील जहागीरदार पहिल्या प्रतीचा सरदार आहे. तो पोंवार रजपूत घराण्यांतील आहे. येथें तीन प्राचीन शिवाचीं देवळें आहेत व जैन लोकांची पारसनाथाचीं पांच मंदिरें आहेत.