विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिजापूर - बस्तर संस्थानांतील मध्यवर्ती तालुक्यांपैकी एक तालुका. क्षेत्रफळ ११६५ एकर. येथें बहुतेक मुरिया लोकांचीच वस्ती आहे. मुख्य पीक तांदूळ, ज्वारी, तीळ, कापूस व ताग. यांत अकरा परगणे असून एक पोलिसठाणें व तीन चौक्या आहेत. मुख्य ठिकाण बिजापूर आहे.