विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बिजली - मध्यप्रांत. ही जमीनदारी भंडारा जिल्ह्याच्या ईशान्य सीमेजवळ आहे. हींत ४८ गांवे आहेत. हिचें क्षेत्रफळ १४० चौरस मैल असून तिची आठ नऊ हजार लोकसंख्या आहे. जमीनदारी जंगलांत पुष्कळ मौल्यवान लांकूड सांपडतें. जमीनदार जातीचा लोधी असून येथील प्रजा विशेषेंकरून गोंड व लोधी आहे.