विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाहवा - हे एक मध्यम आकाराचे झाड आहे. हिंदुस्थानच्या आणि ब्रह्मदेशच्या सपाट प्रदेशांत व हिमालयाच्या पायथ्याशी समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीपर्यंत ते वाढते. या झाडाची साल औषधी असून कांतडी कमविण्याच्या कामी तिचा उपयोग करतात. फळांतील मगज रेचक म्हणून देतात. हे हिंदुस्थानांतील घरगुती औषधांपैकी एक औषध आहे. पुरातन अरबी लोकांना ह्या फळांतील गुण माहीत असल्याचे ऍडॅम्सच्या लेखावरूंन आपणाला कळते. बंगाल्यांत ओढण्याची तंबाखू जास्त सुवासिक करण्याकरिता याचा उपयोग करतात.