विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बास्मत - हैद्राबाद संस्थान परभणी जिल्ह्याचा पूर्वेकडील तालुका. याचे क्षेत्रफळ ६६५ चौरस मैल आहे. १९११ साली जहागिरी धरून लोकसंख्या १००७०४ होती. तालुक्यांत एक शहर बास्मत (लोकसंख्या सुमारे १००००) असून ते मुख्य ठिकाण आहे, शिवाय २१५ खेडी आहेत. त्यांपैकी २१ जहागिरी आहेत. या प्रदेशांत बहुतेक काळी कापसाची जमीन आहे.