विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बांसी - (१) संयुक्तप्रांत. बस्ती जिल्ह्याचा ईशान्येकडील तालुका. यांत विनायकपूर व बांसी (पूर्व) हे परगणे आहेत. क्षेत्रफळ ६१३ चौरस मैल. लोकसंख्या (१९९१) ४१५३५४. उस्का हे या तालुक्यांतील सर्वांत मोठे गाव आहे. यूरोपीय जमीनदारांनी नद्यांना बांध घालून कालवे काढलेले आहेत. इतर ठिकाणी शेतांना तळयाचे पाणी घेतात.
(२) राजपुताना, उदेपूर संस्थानांतील बांसी नांवाच्या इस्टेटीने मुख्य गांव. लोकसंख्या (१९०१) १२६५. या इस्टेटीत ५९ गावे आहेत. व जहागीरदाराला राउत असे म्हणतात. या जहागिरीचे उत्पन्न चोवीस हजार आहे.