विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बांसदी – संयुक्तप्रांतात, बलिया जिल्ह्यांतील एक तालुका. यांत खरीद व शिकंदरपूर हे परगणे आहेत. क्षेत्रफळ ३७६ चौरस मैल. लोकसंख्या (१९११) २६२९३३. मोठी गावे शहतवाड, बांसदी (तालुक्याचे ठिकाण). मणियार, रेवती व शिकंदरपूर ही आहेत. बांसदी गांवची लोकसंख्या (१९११) ७७६४. हे गांव पूर्वी बरौलिया रजपुतांच्या ताब्यांत होते.