विभाग आठरावा : बडोदें ते मूर
बाष्पीभवन व वाय्वीभवन - प्रत्येक पदार्थाला नेहमीच्या वातावरणाच्या दाबाखाली असतांना विशिष्ट उष्णमानावर नेले असता कढ येते व त्या पदार्थांचे रूपांतर होऊं लागते व योग्य कालपर्यंत उष्णता लावली तर त्या सर्व पदार्थाचे वायूंत रूपांतर होते. उदाहरणार्थ, एका भांडयात पाणी घालून त्याचे उष्णमान (सेंटिग्रेड) १००० पर्यंत वाढविले तर त्या पाण्याचे वायुरूप अवस्थेत रूपांतर होते. १००० उष्णमानावर याप्रमाणे पाण्याचे वायूंत रूपांतर होते. परंतु आपण कित्येकदा असे पाहतो की, पाण्याचे उष्णमान १००० पेक्षा पुष्कळ खाली असताना सुध्दां पाण्यापासून वाफ तयार होत असते. हिवाळयात कपडे वाळत घातले असतांना त्या कपडयांपासून वाफा निघतांना दिसतात. कपडयांचे किंवा त्यांतील पाण्याचे उष्णमान केव्हाहि १००० अंश असत नाही, असे असतांना सुध्दा त्या पाण्यापासून वाफा निघतांना दिसतात.
सामान्य वातावरणाच्या विशिष्ट पदार्थांचे विशिष्ट उष्णमानावर वायुरूप अवस्थेत रुपान्तर होते. परंतु विशिष्ट उष्णमानाच्या खाली उष्णमान असतांनाच जर त्या पदार्थाचे वायुसद्दश अवस्थेत रूपांतर होऊ लागले, तर त्या वायुसद्दश अवस्थेतील द्रव्यास बाष्प असे शास्त्रीय नांव आहे. मद्य, ईथर निरनिराळी अत्तरे इत्यादि चपल द्रव्यास उष्णता न लावतांच वायुसद्दश रूप प्राप्त होते, म्हणजे बाष्पावस्था प्राप्त होते, असे म्हणता येईल. कापूर हा पदार्थ त्यापैकीच आहे.
बा ष्प च्या दा बा चे मा प न. - विशिष्ट उष्णमानावर विशिष्ट द्रव्याच्या बाष्पाचा काही ठराविक दाब असतो. शास्त्रज्ञांनी निरनिराळया द्रव्यांचे भिन्न भिन्न उष्णमानावर त्या त्या द्रव्यांच्या बाष्पाचा किती दाब असतो, हें काढले आहे.
स्थि त्यं त र क उ ष्ण ता मा न - एखाद्या भांडयात पाणी भरून त्याला किंचित् उष्णता लावली असता त्या भांडयाच्या वरच्या अंगास त्या पाण्याची वाफ दिसूं लागते, म्हणजे एकाच काळी आपणास पाणी आणि वाफ ही दिसतात. कांचेच्या एका भक्कम नळीत कोणताहि चपल द्रव घालून त्यास उष्णता लावावी, नळीचे उष्णमान एका विशिष्ट उष्णमानापेक्षा जास्त झाल्यास त्या नळीतील द्रवरूपी पदार्थ आणि वायुरूपी (बाष्परूपी) पदार्थ यांच्या दरम्यानचा विभाग करणारा थर दिसेनासा होतो या उष्णमांनास स्थित्यंतरक उष्णमान असा शास्त्रीय शब्द आहे. लाटूर नांवाच्या शास्त्रज्ञाने पाण्यासंबंधाने या बाबतीत प्रयत्न केले व त्यावरून त्याने असे दाखवून दिले की, ३६२० सेंटिमिटर उष्णमानावर पाणी आणि वाफ यांतील फरक दिसेनासा होतो. निरनिराळया द्रवांचे स्थित्यंतरक उष्णमान भिन्न भिन्न आहे.
सं पृ क्ता व स्था - एखाद्या वाटीत एखादा बाष्पभावी किंवा चपल द्रव ठेवून तीवर एक हंडी उपडी ठेवावी, म्हणजे त्या हंडीतील अवकाश त्या चपल द्रवाच्या बाष्पाने व्यापून जाईल. त्या हंडीतील हवा आणि वाफ यांचे प्रमाण काढावे, हे प्रमाण ठराविकच असते असे नाही, परंतु विशिष्ट उष्णमानावर अमुक एक ठराविक दाब उत्पन्न होईल इतके बाष्प उत्पन्न होते, या ठरीव मर्यादेस त्या त्या उष्णमानावरची त्या द्रव्याची संपृक्त वस्था असे नांव आहे. वरील उदाहरणातल्या हंडीत हवा नसली तरी संपृक्त बाष्पाचा दाब तितकाच असतो, हंडीत जरी खेंचून हवा भरली, तरी बाष्पाचा दाब तितकाच असतो, म्हणजे आपणास असे म्हणता येईल की, विशिष्ट उष्णमानावर भिन्न भिन्न प्रमाणांत संपृक्त बाष्पाचा दाब असतो.
क ढ ण्या चे बिं दू - खाली कित्येक द्रव्यांचे कढण्याचे बिंदू दिले आहेत हे कढण्याचे बिंदू सामान्य हवामानाच्या दाबावर काढलेले आहेत.
पदार्थ | कढण्याचे उष्णमान. |
हायड्रोजन | २५२.६ |
आक्सिजन | १८२.८ |
कार्बन डाय-आक्साईड | ७८.३ |
सल्फर डाय-आक्साईड | १०.० |
अनिलीन | १८४.१ |
न्याफ्थालिन | २१८.० |
न्याफ्थगलिन | २१८.० |
बेन्झीफिनान | ३०५.८ |
पारा | ३५६.७ |
गंधक | ४४४.५ |
क्याडमियम् | ७५६.० |
जस्त | ९१६.० |
द्रा व ण आ णि बा ष्पा चा दा ब. – पाण्यांत एखाद्या क्षारास विरघळवून त्याचे द्रावण तयार करावे. या द्रावणाच्या पाण्याच्या बाष्पाचा दाब मोजावा आणि शुध्द पाण्याच्या बाष्पाचा दाब त्याच उष्णमानावर मोजावा. या दोन दाबांत काही अंतर असते. पाण्यांत विरघळलेल्या क्षाराच्या अणुभाराच्या प्रमाणांत बाष्पाचा दाब असतो, असे प्रयोगाने सिध्द झाले आहे.